श्रीसंतचा मोठा खुलासा, ‘पाच वेळा केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न कारण...’

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतवर घालण्यात आलेली आजीवन बंदी बीसीसीआय़ने कमी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 01:49 PM IST

श्रीसंतचा मोठा खुलासा, ‘पाच वेळा केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न कारण...’

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतीय क्रिकेटर एस श्रीसंतवर (S Sreesanth) 2013मध्ये आयपीएलमध्ये सामना फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अडकल्यामुळं श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आली होती. फिक्सिंगच्या आरोपामुळं 26 दिवस श्रीसंतला तिहार जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली होती. दरम्यान जेलमधून बाहेर पडल्यानंतर श्रीसंत काहीकाळ डिप्रेशनमध्ये होता.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतनं याबाबत खुलासा केला. पहिल्यांदाच श्रीसंतनं आपल्या जेलमध्ये खालवलेल्या काळाबद्दल चर्चा केली. श्रीसंतला झालेल्या मानसिक त्रासामुळं त्याला डॉक्टरांची मदतही घ्यावी लागली होती. त्यामुळं मानसिक संतुलन बिघडलेल्या श्रीसंतला क्रिकेटपासून लांब रहावे लागले.

2015 मध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलासह 36 आरोपींची पाटियाला हाउस कोर्टानं निर्दोष मुक्तता केली होती. श्रीसंतने 2005 मध्ये लंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने 27 कसोटीत 87 विकेट घेतल्या आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, श्रीसंतनं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तुरूंगात असतान बलात्कार केलेल्या आरोपींसोबत राहत होतो. ते लोक मला शिव्या घालायचे, प्रत्येक शब्दात शिव्या असायच्या. त्यामुळं मी खुप घाबरून जायचो. हा गोष्टी मी अनेक वेळा अनुभवल्या आहेत.

वाचा-भाजप खासदार गौतम गंभीर अडचणीत, फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल

मार्च 2019 मध्ये श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयानं हटवली होती. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे. श्रीसंतला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्याची शिक्षा निश्चित करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयने श्रीसंतच्या बंदीवर विचार करावा. आजीवनं बंदीची शिक्षा जास्त आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

Loading...

‘सहा महिन्यात पाचवेळा केला आत्महत्येचा प्रयत्न’

या मुलाखतीत श्रीसंतनं, “जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो. तेव्हा जवळ जवळ सहा महिने मी डिप्रेशनमध्ये होते. मी झोपू शकत नव्हतो. काही कारण नसताना रडायचो. अनेक वेळा स्वत:ला सांभाळायणे कठिण झाले होते”, असे सांगितले. तसेच श्रीसंतनं, “मी कधीच कोणाचे वाईट केले नाही, त्यामुळं माझ्यासोबत असे का झाले याचा विचार मी रात्रंदिवस करत होतो. पण मला कधीच उत्तर सापडले नाही. माझ्या एका चुकीची किंमत माझ्यासह परिवाराला भोगावी लागली, याचं दु:ख मला आजही आहे”, असे सांगितले.

वाचा-नेपाळच्या कर्णधाराची विक्रमी कामगिरी, विराट-स्मिथला टाकलं मागे

संगीतामुळं श्रीसंतचे आयुष्य बदलले

श्रीसंतनं डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी संगीताचा वापर केला असे सांगितले. तुरूंगात असताना एक बल्ब होता, त्याकडे श्रीसंक एकटक पाहत राहायचा. त्या बल्बला पाहून त्यानं रोशनी हे गाणं लिहिले होते. सध्या क्रिकेटपासून लांब असलेला श्रीसंत सध्या राजकारण आणि सिनेमात आपलं नशीब आजमावत आहे. श्रीसंतनं बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. सध्या श्रीसंत दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पूजा भट्टसोबत एका वेबसिरीजवर काम करत आहे. याचबरोबर श्रीसंत आत्मचरित्रावरही काम करत आहे. भाजपमध्ये असलेला श्रीसंत शशि थरूर यांच्या विरोधात तिरूवनंतपुरममधून निवडणूक लढवण्यात उत्सुक आहे.

वाचा-शास्त्रींची निवड कऱणारी समिती अडचणीत, पुन्हा होणार प्रशिक्षकाची निवड?

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...