मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /नीता मॅमचं ते पत्र मिळालं अन् मी ढसा ढसा रडू लागलो, Hardik Pandya चा खुलासा

नीता मॅमचं ते पत्र मिळालं अन् मी ढसा ढसा रडू लागलो, Hardik Pandya चा खुलासा

Hardik Pandya

Hardik Pandya

गेल्या काही दिवसांपासून अनफिट फिटनेसमुळे चर्चेच असणारक हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आपल्या खासगी आयुष्यावर उघडपणे बोलताना दिसत आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून अनफिट फिटनेसमुळे चर्चेच असणारक हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आपल्या खासगी आयुष्यावर उघडपणे बोलताना दिसत आहे. दरम्यान, त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळताना आलेल्या अनुभवावर भाष्य करत एक भावनिक किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

पांड्याने आयपीएल (IPL)कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये केली. सुरुवातीलाच तो मुंबई इंडियन्स संघाकडून मैदानात उतरला. त्यानंतर ते आत्तापर्यंतचा त्याचा अनुभव कसा होता हे ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना त्याने शेअर केला आहे. यामध्ये त्याने वडिलांचे निधन झाल्यावर मुंबई इंडियन्स संघाने कशी साथ दिली हा किस्सा त्याने सांगितला आहे.

... तर हार्दिक पांड्याचा टीम इंडियाला मोठा फायदा होईल, कपिल देवनं सांगितलं कारण

पांड्या म्हणाला...

“मुंबई इंडियन्स माझ्या पाठिशी कायमच राहिली आहे. जेव्हा माझे वडील जानेवारी २०२१ रोजी वारले. त्यानंतर कृणाल आणि मला मुकेश सर आणि नीता मॅमचं पत्र मिळालं. त्यांनी पत्रातून शोक व्यक्त केला होता. ते पत्र आमच्यासाठी खूप भावनिक होते. ते वाचल्यानंतर मी ढसाढसा रडू लागलो”, असे हार्दिक पांड्याने सांगितले.

तसेच, आकाश माझा चांगला मित्र आहे. मला कधीच वाटलं नाही की, तो आमचा मालक आहे. तो नेहमीच प्रेरणा देतो आणि पाठिशी उभा असायचा. मी कधीच स्वत:ला महत्त्व देत नाही. मला इतर लोकं चांगलं ओळखतात. कारण मुंबई इंडियन्सने मला ओळख दिली. माझ्यातला क्रिकेटपटू ओळखून विश्वास ठेवला. त्यामुळेच मला फायदा झाला असल्याचे पांड्याने म्हटले आहे.

Hardik Pandya ची मुलाखत सुरू असताना मध्येच घुसला Agastya, पाहा Cute Video

यापूरर्वीही पांड्याने अनेक किस्से ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना शेअर केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Hardik pandya, Mukesh ambani, Mumbai Indians, Neeta ambani