Home /News /sport /

'विराटचा ऍटिट्यूड चांगला, पण...', वादानंतर गांगुलीचा पहिल्यांदाच कोहलीवर निशाणा!

'विराटचा ऍटिट्यूड चांगला, पण...', वादानंतर गांगुलीचा पहिल्यांदाच कोहलीवर निशाणा!

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli vs Sourav Ganguly) टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं.

    मुंबई, 18 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli vs Sourav Ganguly) टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं, पण त्याने ऐकलं नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे त्यांनी विराटला वनडे कॅप्टन्सीवरून हटवण्याचा निर्णय घेतला, असं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला. गांगुलीचं हे वक्तव्य विराट कोहलीने खोडून काढलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली तेव्हा मला कोणीही हे पद सोडू नको, असं सांगितलं नाही. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India tour of South Africa) टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असं विराटने सांगितलं. विराटने गांगुलीचा दावा खोडून काढल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आलं. विराट कोहलीसोबतच्या या वादानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात भाष्य केलं आहे. विराट कोहलीचा ऍटिट्यूड चांगला आहे, पण तो खूप भांडतो, असं गांगुली म्हणाला आहे. कोणत्या खेळाडूचा ऍटिट्यूड आवडतो? असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला होता, त्यावर गांगुलीने हे उत्तर दिलं. आयुष्यामध्ये एवडा तणाव कसा हाताळतोस? असंही गांगुलीला विचारण्यात आलं, तेव्हा माझ्या आयुष्यात कोणताही तणाव नाही, फक्त बायको आणि गर्लफ्रेंडच तणाव देतात, अशी मजेशीर प्रतिक्रिया गांगुलीने दिली. गांगुलीचा सूचक इशारा दरम्यान विराट कोहलीच्या वक्तव्यानंतर वाद वाढल्यामुळे गांगुलीने शुक्रवारी या मुद्द्यावर त्याची अधिकृत भूमिका मांडली होती. आता या गोष्टी आणखी पुढे न्यायला नकोत. मला यावर काहीच बोलायचं नाही. हे प्रकरण बीसीसीआयचं आहे आणि आता बोर्डच हे प्रकरण बघून घेईल, असा सूचक इशारा सौरव गांगुलीने दिला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Sourav ganguly, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या