Home /News /sport /

विराट-रोहित वाद आणि टीम इंडिया, पहिल्यांदाच बोलले निवड समिती अध्यक्ष

विराट-रोहित वाद आणि टीम इंडिया, पहिल्यांदाच बोलले निवड समिती अध्यक्ष

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Rohit Controversy) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) दोन्ही खेळाडू भारतासाठी एकत्र खेळले नाहीत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जानेवारी : विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Rohit Controversy) यांच्यामध्ये वाद सुरू असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) दोन्ही खेळाडू भारतासाठी एकत्र खेळले नाहीत. वर्ल्ड कप संपल्यानंतर विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून विश्रांती घेतली, तर रोहितने टेस्ट सीरिजमधून ब्रेक घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी रोहितला दुखापत झाली, त्यामुळे तो टेस्ट आणि वनडे सीरिज खेळू शकणार नाही. त्यातच विराट कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली, त्यानंतर रोहित-विराट वादाच्या चर्चा आणखी जोर धरू लागल्या. टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी विराट-रोहित वादाच्या चर्चांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. चेतन शर्मा यांनी वादाच्या या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. या दोघांची जोडी कायमच चांगली राहिली. मी कधीच दोघांमध्ये वाद पाहिला नाही, असं चेतन शर्मा ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले. 'वाद नेमका कसला? गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत, त्यामुळे चर्चांवर जाऊ नका. आम्ही सगळे पहिले क्रिकेटपटू आहोत आणि मग सिलेक्टर. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. मी जेव्हा या दोघांमध्ये वादाचं वृत्त वाचतो, तेव्हा मलाच हसायला येतं. भविष्याबाबतची त्या दोघांचीही योजना तयार आहे. जर तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्हालाही हे खेळाडू कसे एक टीम आणि कुटुंब म्हणून एकत्र काम करतात, हे पाहायला मजा आली असती,' असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं. 'लोक जेव्हा अशाप्रकारच्या गोष्टी बनवतात, तेव्हा खूप दु:ख होतं. 2021 चे वाद मागेच सोडून दिले पाहिजेत. भारताला सर्वोत्तम टीम कसं करायचं, याबाबत आता बोललं गेलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया चेतन शर्मा यांनी दिली. बीसीसीआयने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे केएल राहुलला टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या