Home /News /sport /

'तो लहान मुलगा प्रेरित झाला,' 83 पाहून आठवणीत रमला क्रिकेटचा देव!

'तो लहान मुलगा प्रेरित झाला,' 83 पाहून आठवणीत रमला क्रिकेटचा देव!

भारताच्या ऐतिहासिक 1983 वर्ल्ड कप विजयावरचा 83 हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाला आता क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचीही (Sachin Tendulkar) पसंती मिळाली आहे.

    मुंबई, 5 जानेवारी : भारताच्या ऐतिहासिक 1983 वर्ल्ड कप विजयावरचा 83 हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाला आता क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचीही (Sachin Tendulkar) पसंती मिळाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 83 हा चित्रपट पाहिला, एवढच नाही तर तो 39 वर्ष जुन्या आठवणींमध्येही रमला. चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरने एक ट्वीट केलं आहे. 'रणवीर सिंगची ऑलराऊंड कामगिरी. कपिल देव यांची सगळी वैशिष्ट्ये यातून भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयाच्या स्मृतींना उजाळा करून देतात. याच विजयामुळे एक लहान मुलगा प्रेरित झाला, हे मला माहिती आहे,' असं ट्वीट सचिन तेंडुलकरने केलं आहे. 83 या चित्रपटामध्ये भारताच्या विजयानंतर मुंबईच्या रस्त्यावर नाचणारा सचिन तेंडुलकरही दाखवण्यात आला आहे. सचिननेही अनेकवेळा याच विजयामुळे आपल्याला देशासाठी क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं आहे. 1983 वर्ल्ड कपच्या (World Cup 1983) कफायनलमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. कबीर खानच्या दिग्दर्शनातला हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असला तरी बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपटाला कमाई करण्यात फारसं यश आलेलं नाही. या चित्रपटात सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांची भूमिका ताहीर राज भसीन, यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना, मोहिंदर अमरनाथचा रोल साकीब सलीम, रवी शास्त्रींचा रोल धैर्य करवा, के श्रीकांत यांचा रोल जीवा, मदन लाल यांचा रोल हार्डी संधू, बलविंदर सिंग यांचा रोल एमी विर्क, सैय्यद किरमाणी यांचा रोल साहिल खट्टर, संदीप पाटीलचा रोल चिराग पाटील, दिलीप वेंगसरकरचा रोल आदिनाथ कोठारे, किर्ती आझाद यांचा रोल दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांचा रोल निशांत दहिया करत आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांच्या भूमिकेत आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Sachin tendulkar

    पुढील बातम्या