मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'रवी शास्त्रींच्या त्या वक्तव्याचा त्रास झाला', अश्विन बोलून दाखवलं मनातलं दु:ख!

'रवी शास्त्रींच्या त्या वक्तव्याचा त्रास झाला', अश्विन बोलून दाखवलं मनातलं दु:ख!

भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासाठी हे वर्ष उतार-चढावाचं राहिलं. आर.अश्विन टीम इंडियात नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या, यानंतर आता पहिल्यांदाच अश्विन रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याबद्दल थेट बोलला आहे.

भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासाठी हे वर्ष उतार-चढावाचं राहिलं. आर.अश्विन टीम इंडियात नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या, यानंतर आता पहिल्यांदाच अश्विन रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याबद्दल थेट बोलला आहे.

भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासाठी हे वर्ष उतार-चढावाचं राहिलं. आर.अश्विन टीम इंडियात नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या, यानंतर आता पहिल्यांदाच अश्विन रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याबद्दल थेट बोलला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 डिसेंबर : भारताचा स्टार ऑफ स्पिनर आर.अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासाठी हे वर्ष उतार-चढावाचं राहिलं. वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळत असताना अश्विनला दुखापत झाली, यानंतर इंग्लंड दौऱ्यातल्या चारही टेस्टमध्ये अश्विनला टीमबाहेर बसावं लागलं, ज्यामुळे तो कमालीचा नाराज झाल्याची वृत्तही प्रसिद्ध झाली. चार वर्षांनंतर अश्विनचं मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं, जेव्हा त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकलं, ज्यामुळे आता तो टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा बॉलर झाला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आता 427 विकेट आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कपिल देव यांचा 434 विकेटचा विक्रम मोडण्याची संधीही अश्विनकडे आहे. यानंतर अश्विनच्या पुढे फक्त अनिल कुंबळेचा 619 विकेटचा विक्रम असेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या अश्विनने त्याच्या मनातलं दु:ख बोलून दाखवलं आहे. 2019 साली सिडनी टेस्टदरम्यान तेव्हाचे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) परदेशात भारताचा नंबर एकचा स्पिनर असल्याचं वक्तव्य केलं होतं. शास्त्री यांच्या या वक्तव्यामुळे मला खूप त्रास झाला होता, असं स्पष्ट मत अश्विनने मांडलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) 2019 सालच्या सिडनी टेस्टमध्ये कुलदीप यादवने उत्कृष्ट बॉलिंग केली होती आणि 5 विकेट घेतल्या होत्या. ही मॅच ड्रॉ झाली असली तरी भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टेस्ट विजय मिळवला होता. या विजयानंतर रवी शास्त्री यांनी कुलदीप यादव परदेशातला भारताचा सर्वोत्तम स्पिनर असल्याचा दावा केला. तसंच अश्विनची दुखापत आणि फिटनेसवर बोलताना शास्त्रींनी सगळ्यांकडे वेळ आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

अश्विन क्रिकेट मंथलीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मी रवी भाईचा खूप सन्मान करतो, आम्ही सगळेच करतो. आपण सगळे काही म्हणू शकतो आणि मग माघार घेऊ शकतो. तेव्हा मला खूप त्रास झाला होता. आपल्या साथीदाराच्या यशाचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे, असं आपण सगळे बोलतो. मीदेखील कुलदीपसाठी खूश होतो. मी पाच विकेट मिळवू शकलो नाही, पण त्याला ऑस्ट्रेलियात पाच विकेट मिळाल्या. हे किती मोठं आहे, हे मला माहिती आहे. मी जेव्हा चांगली बॉलिंग केली तेव्हाही मला पाच विकेट मिळवता आल्या नाहीत.'

'कुलदीपच्या आणि टीमच्या यशाचा आनंद घेण्यासाठी पहिले मला टीमचा हिस्सा असल्यासारखं वाटलं पाहिजे. जर मला बसखाली फेकलं गेल्यासारखं वाटलं असेल, तर मी टीम आणि खेळाडूच्या यशाच्या पार्टीला कसा येऊ? तरीही मी टीम इंडियाने आयोजित केलेल्या पार्टीला गेलो, कारण भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टेस्ट सीरिज जिंकली होती,' असं अश्विन म्हणाला.

'मी हॉटेल रूममध्ये गेलो आणि बायकोसोबत बोललो. माझी मुलंही तिकडे होती. एवढं सगळं झाल्यावरही मी पार्टीला गेलो, कारण आम्ही तिकडे सगळ्यात मोठा विजय मिळवला होता. दुखापत असतानाही मी पहिल्या टेस्टमध्ये खेळलो.' असं वक्तव्य अश्विनने केलं. पहिल्या टेस्टमध्ये अश्विनने दोन्ही इनिंगमध्ये 3-3 अशा एकूण 6 विकेट घेतल्या होत्या. त्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता.

First published:

Tags: R ashwin, Ravi shastri, Team india