• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL वर प्रश्न विचारल्यामुळे भडकले मायकल होल्डिंग

IPL वर प्रश्न विचारल्यामुळे भडकले मायकल होल्डिंग

बीसीसीआयने (BCCI) 2008 साली आयपीएलला (IPL) सुरुवात केली. आयपीएलमुळे बोर्डाला कोट्यावधी रुपयांची कमाई व्हायला सुरुवात झाली, तसंच जगातले अनेक क्रिकेटपटूही श्रीमंत झाले.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : बीसीसीआयने (BCCI) 2008 साली आयपीएलला (IPL) सुरुवात केली. आयपीएलमुळे बोर्डाला कोट्यावधी रुपयांची कमाई व्हायला सुरुवात झाली, तसंच जगातले अनेक क्रिकेटपटूही श्रीमंत झाले. जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणारं बीसीसीआय आयपीएलमुळे आणखी गर्भश्रीमंत झालं. पण वेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू मायकल होल्डिंग (Michael Holding) आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसत नाहीत. याबाबत प्रश्न विचारला असता मायकल होल्डिंग चांगलेच संतापले. आपण फक्त क्रिकेटवर बोलतो, अशी संतप्त प्रतिक्रिया होल्डिंग यांनी दिली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मायकल होल्डिंग म्हणाले, 'टी-20 फॉरमॅट क्रिकेट नाही. जेव्हा तुम्ही एखादी टी-20 स्पर्धा जिंकता, तेव्हा तुम्ही मोठे झालात असं म्हणू शकत नाही. टी-20 मुळेच वेस्ट इंडिजला टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणं कठीण झालं आहे.' 'जेव्हा तुम्ही 6 आठवड्यांमध्ये 6 लाख आणि 8 लाख डॉलर कमवत असाल, तर तुम्ही काय करायला चालला आहात? मी यासाठी क्रिकेटपटूंना दोष देत नाही. यासाठी प्रशासक जबाबदार आहेत. प्रशासक टेस्ट क्रिकेटबाबत खूप काही बोलतात, पण त्यांना पैसे पाहिजे आहेत. वेस्ट इंडिज टी-20 स्पर्धा जिंकेल, पण ते क्रिकेट नाही. त्यांना टेस्ट क्रिकेटची ताकदवान टीम बनता येणार नाही,' असं विधान होल्डिंग यांनी केलं. 'जगभरातलं टी-20 क्रिकेट खेळासाठी शाप आहे. जर तुम्ही गरीब देश असाल आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतासारखे पैसे देऊ शकत नसलात तर खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळतील. याच कारणामुळे वेस्ट इंडिजचे आणि इतर खेळाडू इकडे हिट होत आहेत,' असं रोखठोक मत होल्डिंग यांनी मांडलं. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आपल्या टी-20 लीगचं आयोजन करत आहेत आणि यामुळे खेळाडूंना चांगला पैसाही मिळत आहे.
  Published by:Shreyas
  First published: