Home /News /sport /

'तेव्हा रवी शास्त्रींनी किती रेड वाईन घेतली असेल?', मायकल वॉनचा टोला

'तेव्हा रवी शास्त्रींनी किती रेड वाईन घेतली असेल?', मायकल वॉनचा टोला

विराट कोहलीने (Virat Kohli) पितृत्वाची सुट्टी घेतलेली असताना आणि महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाही भारताने ऑस्ट्रेलियात (India vs Australia) टेस्ट सीरिज जिंकली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने टीम इंडियाच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 मे : मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी उल्लेखनीय झाली. टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्याच (India vs Australia) मायभूमीत 2-1 ने पराभव करत इतिहास घडवला. विराट कोहलीने (Virat Kohli) पितृत्वाची सुट्टी घेतलेली असताना आणि महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाही भारताने टेस्ट सीरिज जिंकली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने टीम इंडियाच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील, याचा मी विचारही करू शकत नाही, असं वॉन म्हणाला. ऍडलेड टेस्टमध्ये मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भारताने अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मेलबर्नमध्ये धमाकेदार विजय मिळवला, यानंतर सिडनीमध्ये दुखापत झालेली असतानाही हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर.अश्विन (R.Ashwin) यांनी अखेरपर्यंत बॅटिंग करत टेस्ट मॅच ड्रॉ केली. टीम इंडियाचं हे पुनरागमन सर्वोत्कृष्ट होतं, असं मायकल वॉन फॉक्स क्रिकेटशी बोलताना म्हणाला. ब्रिस्बेनमधलं ऑस्ट्रेलियाचं रेकॉर्ड बघता कोणीही भारताला जिंकायची संधी आहे, असं म्हणालं नव्हतं, पण तरीही त्यांनी अनुभव नसलेल्या टीमसोबत विजय मिळवला. ही कामगिरी बघण्यासारखी होती. ऋषभ पंतने (Rishabh Pant) अजिबात न घाबरता केलेल्या बॅटिंगमुळे भारताचा फायदा झाला, असं वक्तव्य मायकल वॉनने केलं. ऋषभ पंत याच्यासोबतच मोहम्मद सिराज, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, टी.नटराजन आणि शार्दुल ठाकूर या अनुभव नसणाऱ्या खेळाडूंनी भारताला ऑस्ट्रेलियात जिंकवून दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारताने घरच्या मैदानात इंग्लंडला टेस्ट सीरिजमध्ये 3-1 ने धूळ चारली. आता टीम इंडिया इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळणार आहे, यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia, Ravi shastri

    पुढील बातम्या