IPLमध्ये धमाका करणारा टीम इंडियाचा शिलेदार करणार कमबॅक? चौथ्या क्रमांकासाठी केला दावा

IPLमध्ये धमाका करणारा टीम इंडियाचा शिलेदार करणार कमबॅक? चौथ्या क्रमांकासाठी केला दावा

आयपीएल किंग टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळण्यात उत्सुक.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी केवळ वर्षभराचा कालावधी उरला असताना सर्व संघांची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे भारतीय संघासमोर एक वेगळीच चिंता लागली आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. या स्थानासाठी याआधी ऋषभ पंतचे नाव घेतले जात होते, मात्र पंतनं निराशाजनक कामगिरी केल्यामुळं भारताचा चौथ्या क्रमांकाचा पर्याय शोधावा लागणार आहे. यासाठी आता आणखी एक खेळाडूनं दावा केला आहे.

धोनीचा खास खेळाडू आणि आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणारा सुरेश रैनाला टी-20 किंग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं सुरेश रैना भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

याआधी ही चौथ्या क्रमांकावर खेळला आहे रैना

सुरैश रैना जवळ जवळ एक वर्ष आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळं भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या अपेक्षा रैनानं सोडून दिल्या होत्या. मात्र, टी-20 वर्ल्ड कपमध्ये रैना भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. रैनानं गेल्या वर्षी 2018मध्ये इंग्लडविरोधात अखेरचा सामना खेळला होता. त्यामुळं आता 2020 आणि 2021मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. हिंदूनं दिलेल्या बातमीनुसार, सुरेश रैनानं चौथ्या क्रमांकावर फलंदाज करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. या क्रमांकासाठी त्यानं याआधीही फलंदाजी केली आहे.

वाचा-रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार कधी?

गेल्या दोन वर्षांपासून चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम आहे. यासाठी अंबाती रायडूपासून विजय शंकर आणि ऋषभ पंतपर्यंत सर्व खेळाडूंना वापरून पाहिले. मात्र एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पंतची बेजबाबदारी खेळी पाहता टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला चांगला पर्याय शोधण्याची गरज आहे.

वाचा-विराटची चिंता वाढली, भारताचं कसोटीतील सिंहासन धोक्यात!

टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचा पहिला शतकवीर आहे रैना

सुरेश रैनानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज होता. रैनानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5615 आणि टी-20मध्ये 1605 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर रैना आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. रैना सुरुवातीपासून महेंद्रसिंध धोनीचा संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासोबत आयपीएलमध्ये खेळत आहे. फलंदाजीबरोबरच रैना एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. त्याच्या फिल्डिंगमुळं त्याला संघात स्थान मिळू शकते. टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं सुरेश रैना भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

वाचा-‘25 वर्षांनंतर आता प्रकरण काढायची गरजचं काय’? द्रविड प्रकरणी धुसपुस सुरूच

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या