IPL 2019 : करोडो रुपये कमवणारा 'हा' खेळाडू करतोय रिक्षामधून प्रवास, VIDEO व्हायरल

IPL 2019 : करोडो रुपये कमवणारा 'हा' खेळाडू करतोय रिक्षामधून प्रवास, VIDEO व्हायरल

आपल्या तुफानी फलंदाजीनं मैदान गाजवणारा हा फलंदाज रिक्षामधून प्रवास करतो तेव्हा...

  • Share this:

हैदराबाद, 11 एप्रिल : आपल्या फलंदाजीनं गोलंदाजांची पिसं काढणारा एक फलंदाज सध्या रिक्षामधून प्रवास करतो आहे. हा खेळाडू हैदराबाद संघाकडून खेळत असून, कोट्यावधी रुपये देऊन त्याला हैदराबाद संघानं विकत घेतलं होते. पण त्याच्यावर अशी वेळ का आली की त्याला रिक्षामधून प्रवास करावा लागत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आणि मैदान गाजवणारा डेव्हिड वॉर्नर सध्या रिक्षामधून प्रवास करतोय. एक वर्ष चेंडू कुरतडण्याच्या गुन्ह्यात वॉर्नरवर बंदी घातली होती. त्यानंतर वॉर्नर हैदराबादकडून खेळताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला वॉर्नर सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. मात्र, वॉर्नरचा एक वेगळाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.सनरायझर्ज हैदराबाद संघाच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. यात वॉर्नर आपल्या मुलीसोबत हैदराबादच्या रस्त्यांवर रिक्षातून फिरताना दिसत आहेत. या व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात वॉर्नरनं 6 सामन्यात 87.25च्या सरासरीनं 349 धावा केल्या आहेत. यात बंगळुरू विरोधात वॉर्नरनं केलेल्या एका शतकाचाही समावेश आहे. हैदराबाद संघानं पहिला सामना गमावल्यानंतर हैदराबादचा संघ पुन्हा विजयीपथावर आला आहे. वॉर्नर सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.


VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलंबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 06:19 PM IST

ताज्या बातम्या