IPL 2019 : आपल्या पहिल्या विजयासाठी भिडणार राजस्थान आणि हैदराबाद

IPL 2019 : आपल्या पहिल्या विजयासाठी भिडणार राजस्थान आणि हैदराबाद

विल्यम्सनच्या पुनरागमनामुळे हैदराबादची बाजू बळकट, तर मकडिंग प्रकरणातून सावरणार राजस्थान.

  • Share this:

हैदराबाद, 29 मार्च : हाता तोंडाशी आलेला घास गमवल्यानंतर आता हैदराबाद आणि राजस्थान हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी सज्ज झाले आहेत.पंजाबविरुद्धच्या सामन्यात बटलर मकडिंग पध्दतीनं बाद झाला आणि राजस्थानच्या हाता तोंडाशी आलेला घास पंजाबनं हिसकावला.

हैदराबादचेही असेच झाले होते. डेव्हिड वॉर्नरच्या तुफान फलंदाजीनंतर सामना जिंकतील असं वाटत असताना आंद्रे रसेल नावाच्या वादळानं गेम बदलला. आजच्या साखळी लढतीत आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणांचे खाते उघडण्यासाठी हैदराबाद आणि राजस्थान आज भिडतील. त्यातच हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनच्या पुनरागमनामुळं एक कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तसेच, घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदाही हैदराबादला होईल.एकीकडं हैदराबादचा संघ विल्यम्सनच्या पुनरागमनामुळं खुश असला तरी, अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यासाठी रशीद खान, डेव्हिड वॉर्नर, शकिब अल हसन व जॉनी बेअरस्टो यांच्यापैकी कोणत्या परदेशी खेळाडूला बाहेर बसवावे, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. तर, गोलंदाजीतही चांगली कामगिरी करणे भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल व संदीप शर्मा या वेगवान त्रिकुटाकडून अपेक्षित आहे.दुसरीकडं राजस्थानचे सलामीवीर बटलर व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी गेल्या लढतीत दमदार सुरुवात केली होती, मात्र मधल्या फळीच्या अपयशामुळे त्यांना सामना गमवावा लागला होता. दरम्यान, चेंडू फेरफारप्रकरणी शिक्षा भोगून संघात परतलेला स्टीव्ह स्मिथला मागच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं स्मिथकडूनही या सामन्यात अपेक्षा असतील.राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात एकूम 9 सामने झाले आहे. त्यातील 5 सामने हैदराबादनं तर, 4 सामने राजस्थानंन जिंकले आहेत.


असा असेल राजस्थान रॉयल्सचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.

असा असेल सनरायजर्स हैदराबादचा संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेअरस्टो, रिद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.

POINTS TABLE:SCHEDULE TIME TABLE:ORANGE CAP:PURPLE CAP:RESULTS TABLE:VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या