S M L

हाॅकी सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला हरवले आहे. 7-1 अशी भारतानं पाकिस्तानावर मात केली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 08:37 PM IST

हाॅकी सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

18 जून : हॉकी वर्ल्ड लीगच्या  उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानला हरवले आहे. भारताने या गेममध्ये चारही क्वार्टरमध्ये आपली बढत कायम ठेवली आणि तब्बल  6 गोल्सने भारतानं पाकिस्तानचा पराभव केला.  7-1 अशी भारतानं पाकिस्तानावर मात केली.

पहिल्या तीन क्वार्टर्स मध्ये पाकिस्तानला आपलं खातही उघडता आलं नाही  . पाकिस्तानसाठी एकमेव गोल उमर भुट्टानं केला.भारतासाठी सलामीचा गोल हरमप्रीतने केला तर शेवटचा गोल आकाशदीपनं केला . या दोघांनीही 2-2 गोल केले.

या मॅच नंतर हाॅकी वर्ल्ड लीगमध्ये भारताचं स्थान अधिकच बळकट झालंय .ही भारतान जिंकलेली सलग तिसरी मॅच आहे . एककीकडे पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट चँपियन्स ट्राॅफीमध्ये भारत पराभवाच्या छायेत असताना हाॅकीमधला हा विजय नक्कीच सुखावणारा आहे. 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 08:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close