मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडिया, मुंबई इंडियन्समधलं स्थान गेलं, आता हार्दिकला बसला आणखी एक मोठा धक्का

टीम इंडिया, मुंबई इंडियन्समधलं स्थान गेलं, आता हार्दिकला बसला आणखी एक मोठा धक्का

Hardik Pandya

Hardik Pandya

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 2021 हे वर्ष निराशाजनक ठरलं. पहिले आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये तो अपयशी ठरला, यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup 2021) त्याची कामगिरी निराशाजनक झाली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 20 डिसेंबर : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 2021 हे वर्ष निराशाजनक ठरलं. पहिले आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये तो अपयशी ठरला, यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup 2021) त्याची कामगिरी निराशाजनक झाली. टीम इंडिया सुपर-12 मधूनच बाहेर झाल्यामुळे सर्वाधिक टीका हार्दिक पांड्यावर झाली. यानंतर मुंबई इंडियन्सनीही (Mumbai Indians) हार्दिकला रिटेन केलं नाही, तसंच भारतीय टीममधूनही तो स्थान गमावून बसला. त्यातच आता हार्दिक पुढचे दोन महिने मैदानात पुनरागमन करू शकणार नाही.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने (BCCI) हार्दिकला एनसीएमध्ये (NCA) जायला सांगितलं आहे. हार्दिक तिकडे एक्सपर्टसोबत बॉलिंग फिटनेसवर काम करेल, त्यामुळे तो 6 ते 20 फेब्रुवारीदरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध (India vs West Indies) होणाऱ्या वनडे आणि टी-20 सीरिजमधूनही बाहेर होऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्ध भारतात झालेली सीरिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही हार्दिकची टीम इंडियात निवड झाली नाही.

खराब फिटनेसमुळे हार्दिक बॉलिंग करू शकत नाही, याच कारणामुळे मुंबई इंडियन्समधूनही त्याने आपलं स्थान गमावलं. हार्दिकला पहिले त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागेल, असं निवड समितीने आधीच सांगितलं आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आयपीएल 2022 साठीचा मेगा ऑक्शन होणार आहे. खराब फिटनेसमुळे त्याची लिलावातली रक्कमही कमी होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने 2015 साली पहिल्यांदा टीममध्ये घेतलं होतं. तेव्हापासून तो याच टीमसोबत होता. यादरम्यान त्याने 92 सामन्यांमध्ये 154 च्या स्ट्राईक रेटने 1476 रन केले याशिवाय 42 विकेटही घेतल्या. मुंबईने त्याला पहिले 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण 2018 साली त्याला 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलं. आता मात्र हार्दिकला एवढी रक्कम मिळणं कठीण आहे.

हार्दिक पांड्या मॅच विनर खेळाडू आहे, पण सध्या तो फिटनेसमुळे त्रस्त आहे, त्यामुळे कोणतीही टीम त्याच्यावर जुगार खेळणार नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. हार्दिक पांड्या आयपीएलच्या दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबादपैकी एका टीमशी जोडला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण दोन्ही टीम त्याला मोठी किंमत द्यायच्या तयारीत नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.

First published:

Tags: Hardik pandya, Ipl 2022, Ipl 2022 auction