Home /News /sport /

DC विरुद्ध कर्णधार सॅमसनचा भन्नाट विक्रम, मैदानात पाय टाकताच बनला राजस्थानचा ‘रॉयल’ खेळाडू

DC विरुद्ध कर्णधार सॅमसनचा भन्नाट विक्रम, मैदानात पाय टाकताच बनला राजस्थानचा ‘रॉयल’ खेळाडू

यापूर्वी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा एकमेव खेळाडू होता, ज्याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी अशी कामगिरी केली होती. आता या यादीत संजू सॅमसन नव्याने सहभागी झाला आहे.

    मुंबई, 22 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2022) मैदानात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यात आमना-सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी खूपच खास ठरला. संजू सॅमसनने दिल्लीविरुद्ध मैदानात पाऊल टाकताच  राजस्थान रॉयल्ससाठी एका खास विक्रमाची नोंद केली आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) मागच्या अनेक हंगामांपासून राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आला आहे. अशात आता शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने या फ्रँचायझीसोबत त्याचा 100 वा सामना खेळला. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीला त्यांच्यासोबत 100 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा दुसरा खेळाडू मिळाला आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा एकमेव खेळाडू होता, ज्याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे 100 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. आता या यादीत संजू सॅमसन नव्याने सहभागी झाला आहे. मागच्या हंगामात सॅमसनने एका चांगल्या कर्णधाराच्या रूपात स्वतःला सिद्ध केले होते, पण संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवू शकला नाही. परंतु या हंगामात चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. चालू हंगामातील पहिल्या 6 सामन्यांपैकी 4 सामने राजस्थानने जिंकले आहेत. गुणतालिकेत संघ 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. झालेल्या या सामन्यात 46 धावांची तुफान खेळी कर्णधार संजू सॅमसनने केली. त्याने 19 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 46 धावा झळकावल्या. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने 222 धावांपर्यंत मजल मारली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, Sanju samson

    पुढील बातम्या