मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final आधी न्यूझीलंडला सगळ्यात मोठा धक्का, टीम इंडियाची परीक्षा सोपी होणार!

WTC Final आधी न्यूझीलंडला सगळ्यात मोठा धक्का, टीम इंडियाची परीक्षा सोपी होणार!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमला मोठे धक्के लागले आहेत. न्यूझीलंडची टीम सध्या इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) टेस्ट सीरिज खेळत आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 8 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमला मोठे धक्के लागले आहेत. न्यूझीलंडची टीम सध्या इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) टेस्ट सीरिज खेळत आहे. या सीरिजची पहिली टेस्ट ड्रॉ झाली, पण दुसऱ्या टेस्टआधी किवी टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) आणि डावखुरा स्पिनर मिचेल सॅन्टनर (Mitchell Santner) यांना दुखापत झाली आहे. विलियमसनच्या कोपराला तर मिचेल सॅन्टनरच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

मिचेल सॅन्टनर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. तर विलियमसनच्या खेळण्याबाबत बुधवारी निर्णय होणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंघममध्ये 11 जूनपासून दुसरी टेस्ट खेळवली जाणार आहे.

विलयमसनचं खेळणं गरजेचं

दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडसाठी विलियमसनचं खेळणं गरजेचं आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची तयारी करण्यासाठी त्याच्याकडे शेवटची संधी आहे. विलियमसनची इंग्लंडमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे. जर दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने मोठा स्कोअर केला, तर त्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 13 रन आणि 1 रन केले होते.

दुसरीकडे मिचेल सॅन्टनरला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी एजाज पटेलला संधी मिळू शकते. एजाज पटेलने 8 टेस्ट मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. 2018 साली एजाजने पदार्पण केलं होतं, आपल्या पहिल्याच सामन्यात 7 विकेट घेऊन तो मॅन ऑफ द मॅच होता.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे, या सामन्याआधी हे दोन्ही खेळाडू फिट झाले नाहीत, तर न्यूझीलंडच्या अडचणी मात्र वाढू शकतात.

First published:

Tags: Cricket, New zealand, Team india