ही बातमी आहे बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, मुलांच्या करिअरला द्या दिशा!

बारावीचा निकाल जाहीर झाला यात काहींनी उज्ज्वल यश मिळवलं असेल तर काहींना अपयश आलं असेल. अपयश आल्यानंतर विद्यार्थी टोकाची भूमिका उचलतात. अभ्यासात जरी मुलांना गती नसली तरी त्यांच्याकडे इतर कला गुणही असतात. अभ्यास आणि परीक्षेतील गुण म्हणजे सर्वस्व नव्हे हे पालकांनी थोडं लक्षात घ्यायला हवं. अभ्यासात हुशार नसणाऱ्या मुलांना त्यांच्या कलागुणांना जोपासण्याची संधी दिली तर ते आवडीच्या क्षेत्रात नाव कमवू शकतात.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 02:41 PM IST

ही बातमी आहे बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, मुलांच्या करिअरला द्या दिशा!

भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत तिन्ही प्रकारात अव्वल आहे. त्याने एका पाठोपाठ अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. क्रिकेटच्या सरावाला त्याने वयाच्या अकराव्या वर्षी सुरूवात केली. यामुळे अभ्यासाकडे त्याचं दुर्लक्ष झालं. विराटने 12 वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारकिर्दीतील चौथा वर्ल्ड कप खेळणार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने 2011 ला वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणाऱ्या या खेळाडूला त्याचं 12 वी नंतरचं शिक्षण मात्र पूर्ण करता आलं नाही.

वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधारपदाची धुरा असलेला रोहित शर्मासुद्धा 12 वी पर्यंतच शिकला आहे. 12 वी नंतर त्याने शिक्षणाऐवजी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.

Loading...

भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षणसुद्धा इंटरपर्यंत झाले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नव्हते आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे.भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षणसुद्धा इंटरपर्यंत झाले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नव्हते आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे.

भारताचा सलामीवीर शिखर धवनचे शिक्षणसुद्धा इंटरपर्यंत झाले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नव्हते आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे.

सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या केएल राहुलने खेळासोबतच अभ्यासाकडेही लक्ष दिले. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याचे नाव घेतले होते. भारतीय संघातील दोन पदवीधरांपैकी तो एक आहे. त्याने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

हार्दिक पांड्याचे क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगले असले तरी अभ्यास मात्र खराब आहे. नववीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला सुरूवात केली. त्यानंतर हार्दिक पांड्या कधीच शाळेकडं फिरकला नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला लहानपणापासून क्रिकेटचं वेड होतं. त्यामुळं साहजिकच अभ्यास करणं म्हणजे एक दिव्य वाटायचं. त्याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेशच घेतला नाही.

आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या जसप्रीत बुमराहला क्रिकेटनं एवढं झपाटलेलं की त्याला शाळेला जाण्याची इच्छाच नव्हती. आई शिक्षिका असल्याने अभ्यासासाठी तगादा लावला जायचा. मात्र जेव्हा त्याच्यातील क्रिकेटमधलं कौशल्य दिसलं तेव्हा हायस्कूलचं शिक्षण झाल्यावर त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

भारताचा वेगवान आणि रिवर्स स्विंगमध्ये तरबेज असणारा गोलंदाज मोहम्मद शमी उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशच्या अंडर 19 संघात निवड न झाल्याने तो कोलकाताला गेला. त्याच्या शिक्षणाबद्दल स्पष्ट माहिती नाही मात्र, तो दहावीपर्यंत शिकल्याचे समजते.

अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवड झालेला विजय शंकर तामिळनाडुचा आहे. केएल राहुलनंतर विजय भारतीय संघातील दुसरा पदवीधर खेळाडू आहे.

केदार जाधव अशा कुटुंबातील आहे जिथं सर्वांनी उच्चशिक्षण घेतलं. त्याच्या तिनही बहिणींनी पीएचडी, इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं आहे. तर केदार जाधवने नववीतच शिक्षणाला रामराम ठोकला.पुढे वाचा... बारावीत अपयश आलंय? हिम्मत हारू नका, या लोकांचा आदर्श घ्या!

केदार जाधव अशा कुटुंबातील आहे जिथं सर्वांनी उच्चशिक्षण घेतलं. त्याच्या तिनही बहिणींनी पीएचडी, इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं आहे. तर केदार जाधवने नववीतच शिक्षणाला रामराम ठोकला. पुढे वाचा... बारावीत अपयश आलंय? हिम्मत हारू नका, या लोकांचा आदर्श घ्या!

राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा एकदा नापास झाले होते. लॅटीन आणि फ्रेंच भाषा शिकत असताना लॅटीन भाषेत ते नापास झाले होते. त्यावेळी निराश न होता अभ्यास करून दुसऱ्या वेळी पास झाले. 'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकात गांधीजींच्या नापास होण्याची कथा आहे.

गांधीजींप्रमाणेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींनासुद्धा लॅटीनने दगा दिला होता. इतिहास आणि राजकारणात चांगले मार्क्स मिळूनही त्यांना लॅटीन भाषेत उत्तीर्ण होता न आल्यानं ऑक्सफर्ड़ युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला नव्हता. त्यांनी दुसऱ्यांदा परिक्षा देऊन प्रवेश मिळवला होता.

अल्बर्ट आइनस्टाइन यांनाही अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणाऱ्या अल्बर्ट आइनस्टाइन यांना 1921 ला भौतिकशास्त्रातील नोबेलनं गौरवण्यात आलं होतं. वयाच्या सतराव्या वर्षी ते कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत गणित आणि विज्ञान वगळता अन्य सर्व विषयांत नापास झाले होते. त्यांचा जन्मदिन जगभरात ‘जीनियस डे’ म्हणून साजरा केला जातो.

महान भारतीय गणितज्ज्ञ रामानुजन हेसुद्धा नापास झाले होते. गणिताकडे ओढा असलेल्या रामानुज यांचं इतर विषयांकडे दुर्लक्ष व्हायचं. यामुळे ते परीक्षेत अपयशी वेडापायी अन्य विषयांमध्ये दुर्लक्ष झाल्याने परीक्षेत अपयशी ठरत होते.

कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जने ऑडिटिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. पण पहिल्याच सत्र परीक्षेत नापास झाल्याने कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर स्टीव्ह जॉब्जने जग बदलून टाकणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मीती केली.

मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हेसुद्धा महाविद्यालयात शिक्षण घेत नापास झाले होते. क्रिकेटचं वेड, नाटकाची आणि लेखनाची आवड यामुळे कुसुमाग्रज गणितात नापास झाले पण त्यांनी निराश न होता पुन्हा अभ्यास करुन विषय सोडवला होता.

कादंबरीकार ना.सी फडके यांच्या माझं बालपण पुस्तकात नापास होण्याची गोष्ट लिहिली आहे. त्यात शंभरपैकी शून्य मार्क या लेखात त्यांनी सांगितलं आहे. वडील मामलेदार होते त्यामुळे अनेक गावात बदली व्हायची आणि ना. सी. फडकेंची शिक्षणातली गोडी कमी झाली होती. गणितात शंभरपैकी शून्य गुण मिळाले होते. तेव्हा अधिक अभ्यास करून हुशार विद्यार्थी म्हणून ओळख मिळवली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे न्यायालयात काम करत करत शिक्षण घेत होते. त्यावेळी नाइट स्कूलमध्ये असताना नाटकात काम करण्याच्या आवडीने त्यांच्यावर तीनवेळा एसएससीत नापास होण्याची वेळ आली होती. पण त्यांनी शिक्षण थांबवलं नाही. पास झाल्यानंतर पुढे पोलिसात नोकरी मिळाली. त्यानंतर वकिलीचं शिक्षणही पूर्ण केलं. राजकारणात आल्यानंतर शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि केंद्रातही त्यांनी मंत्रीपद भूषवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...