मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Eng Vs Ind : विराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल

Eng Vs Ind : विराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल

इग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू आल्यावर विराट कोहलीला काहीच सुचलं नाही.

इग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू आल्यावर विराट कोहलीला काहीच सुचलं नाही.

इग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू आल्यावर विराट कोहलीला काहीच सुचलं नाही.

बर्मिंगहम, 1 जुलै : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या (Ind Vs Eng Test Match) कसोटीत ज्याप्रकारे बाद झाला त्यावरुन त्याच्यावर टीका केली जात आहे. विराट बाद झाल्याचा व्हिडिओही व्हायरल (Video Viral) होत आहे. त्यामुळे विराट कोहलीचं काय चाललंय, असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

नेमकं काय घडलं -

इग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू आल्यावर विराट कोहलीला काहीच सुचलं नाही. त्याने हा चेंडू सोडून देण्याचा विचार केला होता. मात्र, चेंडू पडल्यावर त्याने बॅट वर केली. मात्र, चेंडू आल्यावर तो त्याचवेळी थेट स्टम्पच्या बाजूला झाला आणि चेंडूने स्टम्प उडवले. त्यामुळे विराट बाद झाला. याप्रकारे बाद झाल्यानंतर विराट पुन्हा एकदा अपयशी ठरला, असे दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही सामन्यांमध्ये केलेली चूक त्याने पुन्हा एकदा केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा - IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, IPL स्टारला पहिल्यांदाच संधी

गेल्या तीन वर्षांपासून एकही शतक नाही -

विराट कोहलीने मागील तीन वर्षांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. मागील 18 कसोटी सामन्यात तो सातत्याने चुका करताना दिसला आहे. कोणता चेंडू खेळायचा आणि कोणता सोडून द्यायचा, हे त्याच्या लक्षात येत नसल्याचे इथेच त्याची मोठी चूक होत आहे. विराटला ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडू अनेकदा समजत नव्हता. तसेच ऑफ स्टम्पवर पडणारा चेंडू हा आतमध्ये येणार, असे त्याला वाटायचे आणि त्या चेंडूवर कोहली फटका मारण्यासाठी जाऊन बाद झाला. यावेळीही कोहलीकडून हीच चूक घडली. या सर्व प्रकारानंतर आता विराट कोहलीने आपल्या तंत्रात आता बदल करण्याची गरज आली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

शेवटच्या दोन T-20 मधून बाहेर -

दरम्यान, अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 साठी संघात स्थान मिळाले आहे. मात्र, तो शेवटच्या 2 सामन्यांसाठी बाहेर राहणार आहे. मात्र, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी या युवा गोलंदाजाची संघात निवड करण्यात आली आहे. म्हणजेच लांब फॉरमॅटसाठी तो निवडकर्त्यांचा पर्याय आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन आणि ऋतुराज यांची पहिल्या T20 साठी निवड झाली आहे, पण त्यांना शेवटच्या 2 साठी संघात स्थान मिळू शकले नाही. म्हणजेच आतापर्यंतच्या कामगिरीने ते निवडकर्त्यांना फारसे प्रभावित करू शकलेले नाहीत. ते एकदिवसीय संघातही नाही. त्याचबरोबर दीपक हुडा आणि इशान किशन यांची तिन्ही टी-20 साठी निवड झाली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी इशानला संघात स्थान मिळाले आहे.

First published:
top videos

    Tags: England, Test cricket, Virat kohali