मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कूल कोच राहुल द्रविडकडे किती आहे संपत्ती? शानदार गाड्यांचं आहे कलेक्शन

कूल कोच राहुल द्रविडकडे किती आहे संपत्ती? शानदार गाड्यांचं आहे कलेक्शन

कर्नाटक राज्यात बेंगळुरूमधल्या इंदिरा नगरात एका आलिशान घरात राहुल राहतो. या घराची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

कर्नाटक राज्यात बेंगळुरूमधल्या इंदिरा नगरात एका आलिशान घरात राहुल राहतो. या घराची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

कर्नाटक राज्यात बेंगळुरूमधल्या इंदिरा नगरात एका आलिशान घरात राहुल राहतो. या घराची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

  मुंबई, 12 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन आणि मिस्टर कूल म्हणून ओळखल्या जाणार्‍या राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टी-20 विश्वकरंडकानंतर द्रविड टीम इंडियाचा (Team India) कोच म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. आता 'सुपर गुरू' द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळणार आहे. नेहमी शांत आणि हसतमुख राहणारा राहुल द्रविड हा मीडिया आणि सोशल मीडिया या दोन्हींपासून लांबच राहतो; मात्र माध्यमांच्या नजरा त्याच्यावर असतातच. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Coach) नियुक्ती झाल्यानंतर तो पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, राहुल सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

  राहुल द्रविडची एकूण संपत्ती 23 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 172 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्याला भारताच्या 19 वर्षांखालच्या टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांसाठी सुमारे 5 कोटी रुपये मिळाले आहेत. टीम इंडियाचा कोच (Indian Cricket Coach) झाल्यावरही मानधन म्हणून द्रविडला कोट्यवधी रुपये मिळणार असल्याची माहिती आहे.

  क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही राहुलने भारतीय क्रिकेटमध्ये योगदान दिलं आहे. प्रतिभाशाली क्रिकेटपटू घडविण्यात राहुलाचा मोठा वाटा आहे. आपल्या कामगिरीने द्रविडने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. वर्ल्डकप सामन्यांमध्ये द्रविड जगातला सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. क्रिकेटमधला सगळ्यात संयमी खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. मैदानावर त्याचा राग कधीच अनावर झाल्याचं पाहिलेलं नाही. म्हणूच द्रविडला मिस्टर कूल म्हटलं जातं.

  कर्नाटक राज्यात बेंगळुरूमधल्या इंदिरा नगरात एका आलिशान घरात राहुल राहतो. या घराची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 11 जानेवारी 1973 रोजी जन्मलेला राहुल आपण बरं, आपलं काम बरं या वृत्तीचा आहे; पण त्याला आलिशान आयुष्य जगायला आवडतं, असं त्याच्या जीवनशैलीवरून दिसतं. तथापि तो आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत नाही. तो प्रसिद्धीपासून दूर राहतो आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी उघड होऊ देत नाही. राहुल द्रविड वेगवेगळ्या गाड्यांचाही शौकीन आहे. त्याच्या राहुलकडे मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू 5 सीरीज आणि ऑडी क्यू 5 लक्झरी एसयूव्ही या गाड्या आहेत.

  राहुल द्रविडला अनेक पुरस्कारांनीही (award) गौरवण्यात आलं आहे. क्रिकेटमधल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल द्रविडला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. 2004 मध्ये पद्मश्री, 2004 मध्ये ICC क्रिकेटर ऑफ द इयर आणि 2012 मध्ये डॉन ब्रॅडमन पुरस्काराने त्याला गौरवण्यात आलं आहे. राहुल द्रविडला 'दी ग्रेट वॉल ऑफ इंडियन क्रिकेट' असंही म्हटलं जातं.

  First published:
  top videos