Home /News /sport /

Instagram च्या एका पोस्टमधून विराट कोहली कमावतो इतके रुपये, आकडा ऐकून बसेल धक्का

Instagram च्या एका पोस्टमधून विराट कोहली कमावतो इतके रुपये, आकडा ऐकून बसेल धक्का

टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli) सध्या टेस्ट क्रिकेट राजीनाम्यामुळे चर्चेत आहे. कोहली भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली(Virat Kohli) सध्या टेस्ट क्रिकेट राजीनाम्यामुळे चर्चेत आहे. कोहली सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. दरम्यान, हॉपर हेडक्वार्टरने एक लिस्ट जाहिर केली आहे. या यादीत इंस्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत लोकांच्या नावांचा सहभाग आहे. आणि विराट कोहली देखील त्यापैकी एक आहे. या यादीत विराट कोहली 19व्या स्थानावर आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 179 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो जगातील सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटर आहे. तो त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टवरून करोडो रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवर प्रत्येक प्रमोशनल पोस्टमधून तो 5 कोटींहून अधिक कमावतो. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 179 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 950 कोटी रुपये आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 130 कोटी आहे. विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनला आहे. 2021 च्या याहूच्या इंडिया इयर-एंडर यादीमध्ये विराट कोहली सर्वाधिक सर्च केलेला क्रीडा व्यक्तिमत्व होता. 33 वर्षीय विराटनंतर या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. विराटसोबत या यादीमध्ये बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिचे देखील आहे. ही इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये समाविष्ट केलेली एकमेव भारतीय सेलिब्रिटी आहे. प्रियांका या लिस्टमध्ये 27 व्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 64 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवरील प्रत्येक प्रमोशनल पोस्टमधून ती 3 कोटी रुपये कमवते.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Instagram, Instagram post, Priyanka chopra, Virat kohli

    पुढील बातम्या