मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोहित-धवनविरुद्ध खेळलेल्या 'कॅप्टन'ला अटक, फसवणुकीचा आरोप

रोहित-धवनविरुद्ध खेळलेल्या 'कॅप्टन'ला अटक, फसवणुकीचा आरोप

क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँगचा कर्णधार एजाज खान (Aizaz Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. एजाज खानवर विमा प्रकरणी फसवणुकीचे आरोप झाले आहेत.

क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँगचा कर्णधार एजाज खान (Aizaz Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. एजाज खानवर विमा प्रकरणी फसवणुकीचे आरोप झाले आहेत.

क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँगचा कर्णधार एजाज खान (Aizaz Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. एजाज खानवर विमा प्रकरणी फसवणुकीचे आरोप झाले आहेत.

मुंबई, 21 जुलै : क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँगचा कर्णधार एजाज खान (Aizaz Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. एजाज खानवर विमा प्रकरणी फसवणुकीचे आरोप झाले आहेत. एजाज खानवर 30 लाख हाँगकाँग डॉलर विमा घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप होत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार एजाज खानने दावा केला होता, की तो ट्रॅफिक दुर्घटनेत जखमी झाला होता, पण त्याचदरम्यान तो क्रिकेट मॅच खेळत होता. एका सूत्राने त्याची ओळख मोहम्मद खान म्हणून केली होती. यानंतर 28 वर्षांच्या एजाज खानला चाई वानमध्ये त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

हाँगकाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेनंतर दुखापतीमुळे आपली काम करण्याची क्षमता कमी झाल्याचा दावा एजाज खानने केला होता, पण चौकशीनंतर त्याने 10 पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचं लक्षात आलं.

एजाज खान 2018 साली भारताविरुद्ध आशिया कपही (Asia Cup) खेळला होता. एजाजने भारताविरुद्ध एक विकेटही घेतली होती. शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताने आशिया कप जिंकला होता. एजाज खानला 2019 साली हाँगकाँगचं कर्णधार करण्यात आलं होतं. त्याने आतापर्यंत 58 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 62 विकेट घेतल्या आहेत. एजाजला 19 वनडेमध्ये 16 आणि 39 टी-20 मध्ये 46 विकेट मिळाल्या.

2014 साली एजाज खान चर्चेत आला जेव्हा त्याने नेपाळविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये 4 ओव्हर टाकून 1 च्या इकोनॉमी रेटने 4 रन दिले होते, तसंच त्याने 2 विकेटही घेतल्या होत्या. मागच्या तीन वर्षात एजाज एकही वनडे खेळला नाही, तर मार्च 2020 मध्ये त्याने आपली अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. यावर्षी एप्रिल महिन्यात तो हाँगकाँग ऑल स्टार 50 ओव्हर सीरिजमध्ये खेळताना दिसला.

First published:
top videos

    Tags: Cricket