मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /जर्मनीने तिसऱ्यांदा जिंकला हॉकी वर्ल्ड कप, गतविजेत्या बेल्जियमला धक्का

जर्मनीने तिसऱ्यांदा जिंकला हॉकी वर्ल्ड कप, गतविजेत्या बेल्जियमला धक्का

germany

germany

जर्मनीने गतविजेत्या बेल्जियमचा पराभव करून जर्मनीने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. दोन्ही संघ पूर्ण स्पर्धेत अपराजित होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

कलिंगा, 29 जानेवारी : हॉकी वर्ल्ड कपमध्ये जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात कलिंगा स्टेडियमवर अंतिम सामना झाला. जर्मनीने गतविजेत्या बेल्जियमचा पराभव करून जर्मनीने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. दोन्ही संघ पूर्ण स्पर्धेत अपराजित होते. फुल टाइममध्ये गोल बरोबरीत राहिल्यानंतर सामना शूटआऊटमध्ये गेला. त्यानतंरही गोल बरोबरीत होते. शेवटी सडन शूटआऊटमध्ये बेल्जियमने बाजी मारली.

जर्मनीने २-० अशा पिछाडीवर असताना सामन्यात पुनरागमन करत नॉर्मल टाइमध्ये ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानतंर शूट आऊटमध्ये ५-४ अशा गोल फरकाने जर्मनीने बेल्जियमवर विजय मिळवला. २०१३ नंतर त्यांनी पहिल्यांदाच सर्वात मोठी स्पर्धा जिंकली. पहिल्या शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी पाच संधी मिळाल्या. मात्र दोन्ही संघांनी पुन्हा प्रत्येकी ३ गोल केले. यानंतर निकाल सडन डेथ शूटआऊटमध्ये लागला.

हेही वाचा : U19 महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाला जय शहांनी दिलं विशेष आमंत्रण, मोठ्या बक्षिसाची घोषणा

पहिल्या क्वार्टरमध्ये बेल्जियममध्ये ९ व्या आणि दहाव्या मिनिटाला सलग दोन गोल करून सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. मात्र त्यांना या आघाडीचा फायदा घेता आला नाही. तर दुसऱ्या बाजूला जर्मनीने दबाव न घेता आक्रमक होत पिछाडी भरून काढली आणि ३ गोल करत सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. सामन्यात अखेरच्या क्षणी बेल्जियमने गोल करून बरोबरी साधली आणि सामना शूटआऊटमध्ये पोहोचला.

First published: