सामन्यावेळी मैदानात घुसून गोळीबार, खेळाडूचा जागीच मृत्यू

रांचीमध्ये हॉकीपटूचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात खेळाडूचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 08:44 AM IST

सामन्यावेळी मैदानात घुसून गोळीबार, खेळाडूचा जागीच मृत्यू

रांची, 04 सप्टेंबर : झारखंडमधील रांची जिल्ह्यात उलीडीह गावात भरदिवसा एका हॉकी खेळा़डूची गोळी मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुरंजन समद नावाच्या 28 वर्षीय खेळाडूची हत्या झाल्याची ही घटना रांजीतील खूंटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उलीडिहमध्ये हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनुरंजनही एका संघाकडून खेळत होता. एका सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याची तयारी करत असताना अनुरंजनवर हल्ला करण्यात आला होता. जवळपास 6 ते 7 जण मैदानात घुसताच अनुरंजनला शोधत होते. ते पाहताच अनुरंजन पळायला लागला. त्याला पकडलं आणि काही समजायच्या आतच अनुरंजनवर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अनुरंजनच्या हत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून त्यामागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरु आहे.

अनुरंजनचे नावही पोलिस रेकॉर्डवर होते. त्यामुळं पुर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. 4 वर्षांपूर्वी अनुरंजन एका खूनात तुरुंगवास भोगून आला आहे.

हत्येनंतर पोलिसांनी म्हटलं आहे की, हल्लोखोरांनी हवेत गोळीबार केल्यानंतर दिलेल्या घोषणा या पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असू शकतो. पोलिस अधिक तपास करत आहेत असल्याचंही सांगितलं.

Loading...

VIDEO: राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hockey
First Published: Sep 4, 2019 08:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...