'गोल मशीन' बलबीरसिंग यांचे निधन, ऑलिम्पिकमध्ये देशाला मिळवून दिले होते 3 सुवर्णपदक

'गोल मशीन' बलबीरसिंग यांचे निधन, ऑलिम्पिकमध्ये देशाला मिळवून दिले होते 3 सुवर्णपदक

बलबीरसिंग सीनिअर (Balbir Singh Sr. ) यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदक मिळवून दिले.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता बलबीरसिंग सीनिअर (Balbir Singh Sr. ) यांचे सकाळी 6:17 वाजता निधन झाले. त्यांना बऱ्याच दिवसांपासून फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते. बलबीर सिंग 95 वर्षांचे होते आणि सुमारे एक महिना त्यांन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना श्वास घेण्याचा त्रास होता, त्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते.

बलबीरसिंग सीनिअर यांना 8 मेरोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 18 मेपासून त्यांची प्रकृती बिकट होती, ताप आल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयाचे अभिजीत सिंग यांनी बलबीरसिंग यांच्या मृत्यूची बातमी दिली.

ऑलिम्पिकच्या इतिहासात गोल्डन मॅन म्हणून ओळख

बलबीरसिंग सीनिअर (Balbir Singh Sr. ) यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदक मिळवून दिले. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1ने जिंकलेल्या सामन्यात बलबीरसिंग यांनी पाच गोल केले आणि अद्याप हा विक्रम अबाधित आहे. ते 1975 च्या वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. बलबीरसिंग सिनिअर हे केवळ भारतच नव्हे तर जगातील दिग्गज खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियन खेळाडूंमध्ये बलबीर यांचा समावेश होता.

First published: May 25, 2020, 9:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading