Home /News /sport /

Asia Cup : भारत-पाकिस्तान मुकाबल्याचा थ्रीलर, शेवटच्या 70 सेकंदांमध्ये फिरला सामना

Asia Cup : भारत-पाकिस्तान मुकाबल्याचा थ्रीलर, शेवटच्या 70 सेकंदांमध्ये फिरला सामना

गतविजेत्या भारताने शेवटच्या क्षणांमध्ये गोल गमावल्यामुळे भारत पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला आशिया कप हॉकीचा (Asia Cup Hockey) पहिला सामना 1-1 ने ड्रॉ झाला.

    जकार्ता, 23 मे : गतविजेत्या भारताने शेवटच्या क्षणांमध्ये गोल गमावल्यामुळे भारत पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला आशिया कप हॉकीचा (Asia Cup Hockey) पहिला सामना 1-1 ने ड्रॉ झाला. भारताने 9व्या मिनिटाला कार्ती सेल्वमच्या गोलच्या मदतीने मॅचमध्ये आघाडी घेतली, पण पाकिस्तानच्या अब्दुल राणाने 59व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत बरोबरी केली. भारताचा पुढचा सामना आता मंगळवारी जपानविरुद्ध होणार आहे. जपानने याआधी इंडोनेशियाचा 9-0 ने पराभव केला आहे. पाकिस्तानला मॅचच्या तिसऱ्याच मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण त्यांना गोल करता आला नाही. काही सेकंदांनंतर भारतालाही पेनल्टी कॉर्नरची संधी चालून आली, पण नीलम संजीप सेसचा शॉट पाकिस्तानी गोलकीपर अकमल हुसैनने वाचवला. भारताने पाकिस्तानी डिफेन्सवर सतत दबाव बनवून ठेवला आणि पहिल्या क्वार्टरमध्ये दोन आणखी पेनल्टी कॉर्नर मिळवले. कार्तीने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल नवव्या मिनिटाला केला. मॅचमध्ये पाकिस्तानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण यात त्यांना यश आलं नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या गोलकीपरने शानदार बचाव करत पवन राजभरला गोल करून दिला नाही. भारताला 21व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नरही फेल गेला. हाफटाईमच्या दोन मिनिटं आधी पाकिस्तानला बरोबरीची करण्याची संधी चालून आली, पण पुन्हा एकदा त्यांचा पेनल्टी कॉर्नर फुकट गेला. दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण रिजवान अलीचा शॉट बाहेर गेला. याच्या काही मिनिटांनी भारतीय गोलकीपर सूरज करकेराने अब्दुल राणाचा जवळचा शॉट वाचवला आणि रिबाऊंडवरही अफराजलाही गोल करू दिला नाही. भारतासाठी राजभर आणि उत्तम सिंग यांनी संधी तयार केल्या, पण पाकिस्तानी गोलकीपरने त्यांना यश मिळवून दिलं नाही. अखेरच्या क्षणांमध्ये भारतीय टीमला एकाग्रता भंग झाल्याचा फटका बसला आणि पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. गोल लाईनवर यशदीप सिवाचने बचाव केला पण राणाने रिबाऊंडवर गोल करून पाकिस्तानला बरोबरी करून दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan

    पुढील बातम्या