सोशल मीडियावरची पोस्ट पडली महागात, एका फोटोनं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर

सोशल मीडियावरची पोस्ट पडली महागात, एका फोटोनं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर

धक्कादायक! सोशल मीडियानं संपवलं क्रिकेटपटूचं करिअर.

  • Share this:

सिडनी, 18 नोव्हेंबर : सोशल मीडिया शाप की वरदान याबाबत नेहमीच चर्चा होत असतात. काही वेळा सोशल मीडियाचा वापर फायद्याचाही ठरतो. मात्र इन्स्टाग्रामवरच्या एका पोस्टमुळं करिअरच खराब झाले, असा प्रकार वाचून तुम्हाला धक्का बसेल. सामन्याआधी संघ इन्स्टाग्रामवर जाहीर केल्यामुळं एक क्रिकेटपटूला निलंबित करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील एका खेळाडूवर ही कारवाई करण्यात आली आहे. महिला क्रिकेटपटू एमिली स्मिथवर (Emily Smith) सामन्याआधी प्लेयिंग इलेव्हन सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे तिच्यावर एका वर्षाची बंदी लावली. एमिली स्मिथ महिला बीग बॅश सामन्यात खेळत आहे. तत्पूर्वी सामना सुरू होण्याआधी एमिलीनं एक तास आधीच संघ सोशल मीडियावर जाहीर केला. त्यामुळं क्रिकेटचा नियम मोडल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

वाचा-वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळं शतक हुकलं; गंभीरचा खळबळजनक आरोप

महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाची खेळाडू एमिली स्मिथवर 12 महिन्यांतील 9 महिन्यांची बंदी सस्पेंड केली आहे. त्यामुळं आता पुढचे तीन महिने एमिली क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं स्मिथ आता बिग बॅश लीगच्या या स्पर्धेतून बाहेर झाली आहे. 24 वर्षीय विकेटकीपर बीग बॅश लीगच्या हरिकेन्स आणि सिडनी यांच्यातील सामन्याआधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्लेयिंग इलेव्हन पोस्ट केली. त्यामुळं तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

वाचा-अर्धशतकानंतर पंचांनी दिला चुकीचा निर्णय, बाद होताच मराठमोळ्या क्रिकेटरचा मृत्यू

वाचा-भावाला आऊट करण्याच्या प्रयत्नात क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, पाहा VIDEO

दरम्यान, ज्या सामन्यासाठी स्मिथला निलंबित करण्यात आले तो सामना पावसामुळे रद्द झाला. तरी, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जारी केलेल्या निवेदतनात, स्मिथनं कलम 2.3.2चे उल्लंघन केले असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं या कलमानुसार स्मिथवर कारवाई करण्यात आली आहे. या माहितीचा वापर सट्टाबाजारासाठी होऊ शकते, त्यामुळं ही कारवाई करण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितले आहे.

First published: November 18, 2019, 3:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या