मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Rohit Sharma चं नवं चॅलेंज; 'या' तीन प्रसिद्ध क्रिकेटपटूंना तुम्ही ओळखू शकता का?

Rohit Sharma चं नवं चॅलेंज; 'या' तीन प्रसिद्ध क्रिकेटपटूंना तुम्ही ओळखू शकता का?

रोहित शर्माचं नवं चॅलेंज

रोहित शर्माचं नवं चॅलेंज

दोन दिवसपूर्वी, पत्नी रितीकासोबत प्रँक व्हिडीओ केल्यानंतर आता रोहित शर्माने प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करणारा एक व्हिडीओ शेअर केला (Rohit Sharma's new challenge) आहे. या व्हिडीओमध्ये तो 10 सेकंदाची तीन प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करतो आणि चाहत्यांना ओळखायला सांगतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, ०7 ऑक्टोबर : भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma Social Media) नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. हटके व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना काही ना काही चॅलेंज नेहमी देत असतोच. आताही एक चॅलेंज रोहितने (Rohit Sharma's new challenge) आपल्या चाहत्यांना दिले आहे. रोहितने प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नक्कल करणारा व्हिडीओ केला आहे. आणि या प्रसिद्ध 3 क्रिकेटपटूंनी तुम्ही ओळखू शकता का? असा सवाल उपस्थित केला आहे. दोन दिवसापूर्वी, पत्नी रितीकासोबत प्रँक व्हिडीओ केल्यानंतर आता रोहितने प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करणारा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये तो 10 सेकंदाची तीन प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करतो आणि चाहत्यांना ओळखायला सांगतो. या व्हिडीओवर अनेक क्रिकेटपटूंसह नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. तर या कमेंट आणि क्रिकेटपटू कोण हे आम्ही सांगण्यापूर्वी तुम्हीच हा व्हिडीओ पाहून ओळखण्याचा प्रयत्न करा.
या व्हिडीओमध्ये असणारे तीन क्रिकेटपटू कोण? यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये युवा फलंदाज पृथ्वी शॉनेदेखील कमेंट केली आहे. तर व्हिडीओ पाहून पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आणि शेवटचा हरभजन सिंग हे तर सर्वांना कळतं. पण मधला खेळाडू कोण यावर अनेकांची वेगळी उत्तरे आली आहेत. हे वाचा-  पाकिस्तानची पुन्हा फजिती! न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आणखी एका देशाचा दौरा रद्द यामध्ये पृथ्वीने राहुल द्रविड असे गेस केले आहे. पृथ्वीशिवाय प्रियम गर्गने मात्र मधला क्रिकेटपटू महेला जयवर्धने असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी मोहम्मद कैफ, वीरेंद्र सेहवाग, स्टीव स्मिथ अशा कमेंट्सही केल्या आहेत.
First published:

Tags: Cricket news, Mumbai Indians, Rohit sharma

पुढील बातम्या