हिमा दासची ‘सुवर्ण’ झेप, चार दिवसांत पटकावले दुसरे गोल्ड मेडल

हिमा दासची ‘सुवर्ण’ झेप, चार दिवसांत पटकावले दुसरे गोल्ड मेडल

हिमानं 200 मीटरचे अंतर 23.77 सेंकदात पार केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जुलै : भारताची धावपटू हिमा दास हिनं ऐतिहासिक कामगिरी करत सलग दुसरे सुवर्ण पदक कमावले आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमा दिसने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. याआधी हिमानं पोलंडमध्ये झालेल्या पोजनान अॅथलेटिक्स ग्रां प्रीमध्ये महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होते. आता कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्ण पदक पटकावले आहे.

हिमा गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीनं त्रस्त आहे. हिमाची यावर्षीची पहिलीच स्पर्धा होती. तिनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी गेल्या वर्षी नोंदवली होती. हिमानं 200 मीटरचे अंतर 23.77 सेंकदात पार केले. याशिवाय वीके विस्मयाने 24.06 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले आहे. तर, पुरूषामध्ये मोहम्मद अनसनेही 21.18 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दरम्यान याच स्पर्धेत गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंह तूरनं कांस्यपदक पटकावले. आशियाई चॅम्पियन तूरनं पुरुषांच्या गोळाफेकीत 19.62 मीटर गोळाफेक करत कांस्यपदकावर नाव कोरलं. हिमा दासने गेल्या वर्षी IAAF च्या 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हिमा अव्वल ठरली होती.अशा प्रकारची स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमा दासचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, आसामच्या या युवा खेळाडूने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हिमाच्या या कामगिरीने नवोदीत खेळाडूंना प्रेरणा मिळेल.

वाचा- यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

वाचा- इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Hima Das
First Published: Jul 8, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या