नवी दिल्ली, 05 जुलै : भारताची धावपटू हिमा दासने आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. हिमानं पोलंडमध्ये झालेल्या पोजनान अॅथलेटिक्स ग्रां प्रीमध्ये महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. जागतिक ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या हिमाने 200 मीटर अंतर 23.65 सेकंदात पूर्ण केलं. यासह तिनं सुवर्ण पदक पटकावलं.
हिमा गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीनं त्रस्त आहे. हिमाची यावर्षीची पहिलीच स्पर्धा होती. तिनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी गेल्या वर्षी नोंदवली होती. 200 मीटरमध्ये 23.10 सेंकदाची वेळ नोंदवली होती.
हिमाने पदक मिळवलेल्या स्पर्धेत भारताचा गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंह तूरनं कांस्यपदक पटकावलं. आशियाई चॅम्पियन तूरनं पुरुषांच्या गोळाफेकीत 19.62 मीटर गोळाफेक करत कांस्यपदकावर नाव कोरलं.
हिमा दासने गेल्या वर्षी IAAF च्या 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हिमा अव्वल ठरली होती.अशा प्रकारची स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती.
Many congratulations to Assam's sprint sensation @HimaDas8 for clinching 200m at Poznan Athletics Grand Prix in Poznan, Poland.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 4, 2019
My best wishes for all future endeavours.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमा दासचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, आसामच्या या युवा खेळाडूने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हिमाच्या या कामगिरीने नवोदीत खेळाडूंना प्रेरणा मिळेल.
World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा