नवी दिल्ली, 18 जुलै : भारताची युवा धावपटू हिमा दाससध्या आपल्या सुवर्ण दिवसात आहे. आपल्या शानदार खेळाच्या जोरावर 15 दिवसांत तिनं देशासाठी चौथे सुवर्ण पदक मिळवले आहे. झेक प्रजासत्तक येथे होत असलेल्या टाबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर फेरीत तिनं सुवर्ण पदक जिंकले. हिमानं बुधावारी 23.25 सेकंदात 200 मीटरची रेस पूर्ण केली.
याआधी हिमा दासने जुलै महिन्याच्या सुरुवातीला 2019 या वर्षातील पहिली स्पर्धा जिंकत सुवर्ण पदक पटकावलं होतं. तिनं पोलंडमध्ये पोजनान अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नावं कोरंल होतं. त्यानंतर क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकारात तिसरं सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं. वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे.
4th GOLD in 15 days!!@HimaDas8 wins fourth gold medal.
आसामची असणार हिमा दास हिचे घर पुरामध्ये वाहून गेले आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं असून महापूर आणि जमिन खचल्याच्या घटना घडल्या आहेत. आसाममध्ये एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 175 गावातील जवळपास 50 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत.
पुरग्रस्तांसाठी दिले आपले अर्धे वेतन
हिमा दासनं आसाममधील पुरग्रस्तांसाठी तिचं अर्ध वेतन दिलं आहे. याशिवाय पुरग्रस्तांना मदत करा असं आवाहनही केलं आहे. आसाममध्ये पुरस्थिती बिकट असून जवळपास 50 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यासाठी हिमाने इंडियन ऑईलकडून मिळणाऱ्या वेतनातील अर्धी रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे.
देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस