सहा सुवर्ण जिंकूनही हिमा वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर, AFI च्या यादीत नाव नाही

सहा सुवर्ण जिंकूनही हिमा वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर, AFI च्या यादीत नाव नाही

भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं आय़एएफला पाठवलेल्या यादीत हिमा दासचं नाव नाही. याआधी पाठवलेल्या 7 नावांमध्ये तिचा समावेश होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : भारताची स्टार धावपटू हिमा दासच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं(एएफआय़) आयएएफला पाठवलेल्या खेळाडूंच्या यादीत हिमाचं नाव नाही. या यादीमध्ये नाव टाकण्यासाठी 16 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. एएफआयने 4x400 रिले आणि 4x400 मिक्स्ड रिलेसाठी 9 सप्टेंबरला हिमासह 7 खेळाडूंची यादी जाहीर केली होती.

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा दोहा इथं 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबरदरम्यान होणार आहे. एएफआयने आय़एएएफला पाठवलेल्या महिला अॅथलीटच्या यादीत हिमा दासचे नाव नाही. या यादीत रिलेसाठी विस्मया वीके, पूवम्मा एमआर, जिस्ना मॅथ्यू, रेवती वी, शुभा वेंकटेशन, विद्या आर यांची नावे आहेत.

हिमा दासचे नाव मिक्स रिलेच्या यादीत असेल असं म्हटलं जात होतं. मात्र, मोहम्मद अनास, निर्मल नोह टोम, अमोज जॅकब यांच्यासह जिस्ना, पूवम्मा आणि विस्मयांना संधी देण्यात आली. दोन्ही रिलेच्या टीममध्ये हिमाचे नाव जोडण्यासाठी एएफायकडे 16 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. मात्र, यासाठी यादीतील एका धावपटूला नाव मागे घ्यावं लागेल. रिलेसाठी फक्त सहा धावपटूंची नावं पाठवता येतात.

गेल्या वर्षीपासून हिमा पाठदुखीनं त्रस्त आहे. एप्रिलमध्ये आशियाई चॅम्पियनवेळी ती 400 मीटर शर्यतीतून बाहेर पडली होती. तेव्हा तीच्या दुखापतीबद्दलची माहिती प्रशिक्षकांनी दिली होती.

हिमा दासला वर्ल्ड चॅम्पियनशिपची पात्रता गाठता आली नाही. प्रशिक्षणावेळी तीनं फक्त 400 मीटर शर्यत पूर्ण केली. जास्त पल्ल्याच्या शर्यतीत तिला पाठदुखीचा त्रास जाणवला. हिमाने युरोपमध्ये 200 मीटर शर्यतीत चार तर 400 मीटर शर्यतीत एक सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर 300 मीटरमध्येही एक सुवर्णपदक पटकावलं. यात तिला वैयक्तिक 52.09 सेकंदाची वेळ नोंदवता आली होती. तिच्या

एएफआयचे अध्यक्ष आदील सुमिरवाला यांनी सांगितलं की, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हिमा भाग घेईल की नाही याबद्दल माहिती नाही. मात्र ती सध्या युरोपमध्ये आहे. अजुनही फिट नाही. तंदुरुस्त झाली नाही तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता येणार नाही.

हिमाने स्पर्धेत भाग घेतला आणि ऐनवेळी दुखापतीनं ती बाहेर पडली तर संघाचं नुकसान होऊ शकतं. ती फक्त 20 वर्षांची आहे आणि तिनं ऑलिम्पिकच्या दृष्टीने विचार करायला हवा. 2024 च्या ऑलिम्पिक पर्यंत तीची कारकिर्दी उंचीवर असेल अशा परिस्थितीत अतिरिक्त दबाव घेऊ नये असं वाटत असल्याचं सुमिरवाला म्हणाले.

भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 14, 2019, 11:21 AM IST
Tags: Hima Das

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading