30 जानेवारी : आयपीएल माजी कमिश्नर ललित मोदींना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. ईडीनं आयपीएल संदर्भात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. यात बीसीसीआयच्या ७ पदाधिकाऱ्यांची उलटतपासणी करण्यात येणार आहे.
मोदी देशाबाहेर असल्यानं त्यांना साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी ईडीनं केला होता विरोध आणि ईडी कोर्टाने त्यानुसार उलटतपासणीची परवानगी नाकारली होती, त्याविरोधात मोदींनी याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्यानं ललित मोदींना दिलासा दिला आहे.
२००९ साली झालेल्या आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्या प्रकरणी फेमा कायदा अंतर्गत ईडीनं दाखल केलेल्या याचिकेत ईडी कोर्टानं मोदी यांना उलटतपासणी करण्यास परवानगी नाकारली होती त्याविरोधात मोदी यांनी हायकोर्टात याचिका केली होती. या प्रकरणात फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याचं हायकोर्टाच्या तपासात समोर आलं आहे.