Happy Birthday Virat Kohli: इतकी आहे कॅप्टन कोहलीची वार्षिक कमाई, किंमत वाचून थक्क व्हाल

फोब्ज (Forbes) मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत विराटचा या वर्षी 66वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी आणि या वर्षीही या यादीत स्थान पटकवणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.

फोब्ज (Forbes) मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत विराटचा या वर्षी 66वा क्रमांक आहे. गेल्या वर्षी आणि या वर्षीही या यादीत स्थान पटकवणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.

  • Share this:
    मुंबई, 5 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट हा जगविख्यात क्रिकेटपटू आहेच पण त्याच्या नावे अनेक विक्रमही नोंदलेले आहेत. विराटनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 86 कसोटींत 7240, 248 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,867, तर 81 टी-20 क्रिकेट सामन्यांत 2794 धावा केल्या आहेत. एवढ्या कमी वयातच त्याने उत्तुंग यश मिळवलं आहे. 5 नोव्हेंबर 1988 ला जन्मलेला विराट केवळ क्रिकेटरसिकांचा लाडका नाही, तर तो विविध ब्रँड्सचाही लाडका आहे. इतकी आहे विराटची वार्षिक कमाई - विराट आघाडीचा क्रिकेटपटू असल्यामुळे त्याची ब्रँड व्ह्यॅल्यूही खूप आहे. फोब्ज (Forbes) मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत विराटचा या वर्षी 66वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याने या वर्षी 30 पायऱ्या वर झेप घेतली आहे. गेल्या वर्षी आणि या वर्षीही या यादीत स्थान पटकवणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. विराटने 2019 मध्ये अंदाजे 25 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 1,85,64,25,000 रुपये कमवले आहेत. या वर्षी 2020 मध्ये त्याची कमाई 26 मिलियन डॉलर्स म्हणजे 1,93,09,42,000 रुपये इतकी झाली आहे. (वाचा - Happy Birthday: भारतीय क्रिकेटमधील विराट कोहलीचे असे रेकॉर्ड जे मोडणं ठरेल अशक्य) विराट बीसीसीआयचा A+ दर्जाचा खेळाडू असून त्याला वर्षाला 1 मिलियन डॉलर्स पगार मिळतो, उर्वरित 1 मिलियन डॉलर्स इतर स्पर्धांचं मानधन, बक्षिसाची रक्कम असे वर्षाला 2 मिलियन डॉलर्स तो क्रिकेटमधून कमवतो. बाकीचे 24 मिलियन अमेरिकी डॉलर्स त्याला ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळतात. (वाचा - टीममध्ये निवड होण्याकरता वडिलांकडे मागण्यात आली होती लाच, विराटचा गौप्यस्फोट) सोशल मीडियावर त्याचे प्रचंड चाहते आहेत. तो ऑडी, हिरो, एमआरएफ, प्युमा, व्हॅल्व्होलिन अशा अनेक ब्रँड्सचा ब्रँड अम्बॅसेडर आहे. तो आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही कर्णधार आहे. पण आतापर्यंत त्याला बेंगलोर संघाला आयपीएल विजेतेपद मिळवून देता आलेलं नाही. आयपीएल 2020 मध्ये आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली यंदा आरसीबीला आयपीएल विजेतेपद पटकावता येतं का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published: