Home /News /sport /

Henry Nicholls Out: दोघांच्याही बॅटने बॉल टोलवला; बॅडलकी निकोलस असा कसा झाला बाद

Henry Nicholls Out: दोघांच्याही बॅटने बॉल टोलवला; बॅडलकी निकोलस असा कसा झाला बाद

नशीब खराब असलेला फलंदाज अशाप्रकारे कॅच आऊट होऊ शकतो. अशीच एक विकेट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या कसोटीत पाहायला मिळाली.

    नवी दिल्ली, 24 जून : क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजाला थेट झेलबाद होताना पाहिलं असेल. झेलबाद होणं हे काही क्रिकेटमध्ये नवीन नाही. अनेकदा बॉड्रीं लाईनवर दोन फिल्डर संतुलन साधत अफलातून झेल पकडतानाही आपण पाहिलं आहे. पण, ख्रिजवरील दोन्ही बॅटसमनच्या बॅटला बॉल लागून अनोख्या प्रकारे खेळाडू बाद झाल्याचे तुम्ही कदाचित पाहिलं नसेल. घडलं असं की, एका फलंदाजाने फटका मारला आणि चेंडू नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या फलंदाजाच्या बॅटला लागला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात अलगद (New Zealand vs England) गेला. खरंतर, नशीब खराब असलेला फलंदाज अशाप्रकारे कॅच आऊट होऊ शकतो. अशीच एक विकेट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या कसोटीत पाहायला मिळाली. हा कसोटी सामना गुरुवारपासून (२३ जून) लीड्समध्ये खेळला जात आहे. किवी संघाने 123 धावांवर पाच विकेट गमावल्या - या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी मारक ठरला. किवी संघाने 83 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. येथून हेन्री निकोलस आणि डॅरेल मिशेल यांनी डाव सांभाळला, मात्र, निकोलस अशा वाईटप्रकारे बाद झाला. त्याने 99 चेंडू खेळून केवळ 19 धावा केल्या. अशा प्रकारे निकोलस झाला बाद - न्यूझीलंड संघाची धावसंख्या 123 झाली होती आणि फिरकी गोलंदाज जॅक लीच 56 वी ओवर टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर निकोलसने (Henry Nicholls) पुढे जाऊन सरळ शॉट खेळला. चेंडू हवेत वेगाने गेला आणि नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या मिशेलच्या बॅटला लागला. येथून चेंडू हवेत लाँगऑफच्या दिशेने गेला, क्षेत्ररक्षक अॅलेक्स लीसने झेलबाद करून निकोलसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अंपायरने नियमानुसार निकोलसला बाद घोषित केलं. हे वाचा - Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्ससाठी पुरूष हॉकी टीम जाहीर; मनप्रीत सिंहकडे कर्णधारपदाची जबाबदारी MCC चे नियम काय म्हणतात? मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) कायद्यानुसार, कलम 33.2.2.3 अन्वये चेंडू यष्टी, पंच, इतर क्षेत्ररक्षक, धावपटू किंवा इतर फलंदाजाला लागून क्षेत्ररक्षकाने पकडला तर त्याला कॅच-आउट ठरवेल जाते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news

    पुढील बातम्या