मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Pak vs Eng: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात थोडक्यात बचावला इंग्लंडचा हॅरी ब्रूक, Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Pak vs Eng: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात थोडक्यात बचावला इंग्लंडचा हॅरी ब्रूक, Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

थोडक्यात बचावला इंग्लंडचा हॅरी ब्रूक

थोडक्यात बचावला इंग्लंडचा हॅरी ब्रूक

Pak vs Eng: इंग्लंड वि. पाकिस्तान टी20 मालिकेतला तिसरा सामना कराचीत पार पडला. पण या सामन्यात एक दुर्घटना होता होता टळली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

कराची, 24 सप्टेंबर: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपआधी या दौऱ्यात उभय संघ 7 टी20 सामने खेळणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत तीन सामने झाले असून पाहुण्या इंग्लंडनं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. याच मालिकेतला तिसरा सामना काल कराचीत पार पडला. पण या सामन्यात एक दुर्घटना होता होता टळली. सुदैवानं त्यात खेळाडूला कुठलीही दुखापत झाली नाही.

हॅरी ब्रूक थोडक्यात बचावला

कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर ही घटना सामन्याच्या 17व्या ओव्हरमध्ये घडली. पाकिस्तानकडून वेगवाग गोलंदाज हॅरीस रौफ यावेळी बॉलिंग करत होता. तर स्ट्राईकवर होता इंग्लंडचा हॅरी ब्रूक. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ब्रूकने पूल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न पुरता फसला आणि बॉल त्याच्या थेट हेल्मेटवर आदळला.

बॉल इतका वेगात होता की हेल्मेटमधून तो थेट ब्रूकच्या हेल्मेटमध्ये जाऊन अडकला. सुदैवानं यावेळी ब्रूकच्या चेहऱ्याला कोणतीही दुखापत झाली नाही. पण अम्पायरनं बॉल डेड घोषित केला आणि तातडीनं फिजिओंना पाचारण करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ पीसीबीनं ट्विटरवर शेअर केला आहे.

ब्रूकची मोठी इनिंग

दरम्यान याच सामन्यात ब्रूक इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानं 35 बॉल्समध्ये 231 च्या स्ट्राईक रेटनं 81 धावांची नाबाद खेळी केली. त्यात आठ फोर आणि पाच सिक्सर्सचा सामावेश होता.

हेही वाचा - Roger Federer: फेडरर-नदालला रडताना पाहून विराट कोहलीनं केली इमोशनल पोस्ट, म्हणाला 'खेळांच्या दुनियेतलं...'

इंग्लडचा दुसरा विजय

दरम्यान कराचीतला तिसरा टी20 सामना जिंकून इंग्लंडनं पाकिस्तानवर आघाडी मिळवली आहे. या सामन्यात इंग्लंडनं पाकला 63 धावांनी पराभूत करुन मालिकेतला दुसरा विजय साकार केला. या मालिकेच्या निमित्तानं इंग्लंडचा संघ 2005 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news