स्मिथच्या धक्कादायक अपघातानंतर बदलणार क्रिकेटमधला सर्वात मोठा नियम!

स्मिथच्या धक्कादायक अपघातानंतर बदलणार क्रिकेटमधला सर्वात मोठा नियम!

अॅशेस मालिकेत स्मिथला झालेल्या गंभीर अपघातानंतर क्रिकेटमध्ये नवे नियम येऊ शकतात.

  • Share this:

लंडन, 19 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळं स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावं लागलं, त्यानंतर पुन्हा तो मैदानात उतरला. मात्र आता लॉर्ड्स मालिकेतून स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला आहे. 80 धावांवर खेळत असताना आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला. तेव्हा तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आहे. आयसीसीच्या बदललेल्या नियमानुसार पहिल्यांदाच क्रिकेटपटूच्या रिप्लेसमेंटचा वापर करण्यात आला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील क्रिकेटरच्या सुरक्षेसाठी आता मानेची सुरक्षिततवाला हेल्मेट वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युज याच्या मृत्यूनंतर मैदानावर खेळाडूंच्या सुरक्षतेवर भर देण्यात आला. 2014मध्ये शैफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान ह्युजच्या डोक्याला चेंडू लागून त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं पर्यायी खेळाडूचा नियम लागू केला. आता हा नियम आयसीसीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येत आहे.

स्टेम गार्ड्सचा होणार वापर

ह्जूजच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानेच्या सुरक्षेसाठी स्टेम गार्ड वापरण्यात आला. मात्र त्याची सक्ती करण्यात न आल्यामुळं अशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ हेड गार्ड न वापरता मैदानात उतरला. त्यामुळं आता स्टेम गार्डचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विज्ञान खेळ आणि चिकित्सा प्रमुख अलेक्स कोंटोरिस एक वर्ष याचा वापर करून पाहणार आहे. त्यानंतर या हेल्मेटची सक्ती करण्यात येईल. आयसीसीही याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकतो.

वाचा-जोफ्रा आर्चर म्हणजे फलंदाजांचा कर्दनकाळ! आतापर्यंत 7 फलंदाजांना केले जखमी

सकाळी बेशुध्द अवस्थेत उठला स्मिथ

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीनं, डोक्याला चेंडू लागल्यानंतर सकाळी स्मिथ उठला तेव्हा तो बेशुध्द अवस्थेत होता. त्यानंतर पुन्हा त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला सामन्याच्या बाहेर करण्यात आले. दरम्यान मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आले आहे. आयसीसीच्या बदललेल्या नियमानुसार पहिल्यांदाच क्रिकेटपटूच्या रिप्लेसमेंटचा वापर करण्यात आला.

वाचा-इशांत शर्माची तुफानी गोलंदाजी, स्वस्तात आटपला वेस्ट इंडिजचा डाव

तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार स्मिथ

स्मिथला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळं तो, तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत साशंकता आहे. गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. स्मिथ वर्ल्ड कपपासून फॉर्ममध्ये आहे. त्यानं पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती.

वाचा-ऑस्ट्रेलियाला मोठा दणका! धक्कादायक अपघातानंतर स्टीव्ह स्मिथ संघाबाहेर

VIDEO: नागपूरमध्ये टँकर उलटला; तेलासाठी लोकांची झुंबड

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading