जेव्हा तो मैदानावर आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आला तेव्हा त्याने आपला संपूर्ण चेहरा निळा कलरने रंगवला होता. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दीपक पटेलने रोहित शर्माची तुलना देवाशी केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो आपले शरिर निळ्या रंगानी रंगवतो. दीपकने सांगितले की, 2017 मध्ये त्याने एमआय आणि कर्णधार रोहित शर्माला फॉलो करायला सुरुवात केली. सुपरफॅन दीपकचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यामध्ये “रोहित सर माझे प्रेरणास्थान माझे देव आणि माझे सर्व काही आहे. तो खरोखर माझा आवडता खेळाडू आहे. मला त्यांच्याबद्दल कसे वाटते ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. प्रथम नागपूर कनेक्शन आहे आणि त्यानंतर ते पुढील स्तरावर आहे.” अशा भावना दीपकने व्यक्त केल्या आहेत. मुंबई इंडियन्स (MI) ही टीम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीमपैकी एक मानली जाते. एमआयचा कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) आतापर्यंत संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, यदांच्या सीझनला मुंबईची सुरुवात खराब झाली आहे. दरम्यान, एका चाहत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नागपूर से मुंबई तक Humare super-fan Dipak ki baat hi kuch aur hai! #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 MI TV pic.twitter.com/e9oStV4ySX
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma