मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'पत्नीसाठी कधी सॅनिटरी नॅपकीन आणलंय का?' राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंमध्ये पीरियड्सची चर्चा; पाहा VIDEO

'पत्नीसाठी कधी सॅनिटरी नॅपकीन आणलंय का?' राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंमध्ये पीरियड्सची चर्चा; पाहा VIDEO

पुरुषांनाही पीरियड्स सुरू झाले तर..???....असे अनेक प्रश्न या खेळाडूंना विचारले व त्यांनीही मोकळपणाने यावर उत्तरं दिली

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : सध्या जगभरात आयपीएलची धूम सुरू आहे. त्यात खेळाडू अधूनमधून नवनवे प्रयोग करीत आहेत. सध्या राजस्थान रॉयल्सचे स्टार रॉबिन उथप्पा आपल्या आयपीएलच्या तीन खेळाडूंसोबत रॅपिड फायर क्विज खेळत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने पुरुषांना सॅनिटरी नॅपकीन खरेदी करण्यापासून प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमपर्यंत प्रश्न विचारले आहेत. याचा एक व्हिडीओ क्लीप राजस्थान टीमने शेअर केली आहे. ज्यानंतर त्यांचं कौतुक केलं जात आहे.

सर्वसाधारणपणे पाहिलं जातं की मासिक पाळीबाबत बोलताना पुरुष संकोच ंकरतात. मात्र अशा प्रकारचा व्हिडीओ करुन समाजातील निषिद्ध वाटणाऱ्या गोष्टींची चौकट मोडली जात आहे. आयपीएल फ्रँचायजीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केलेल्या या क्लिपमध्ये राहुल तेवतिया,  जोस बटलर आणि डेविड मिलर याने उथप्पाला या विषयावर मोकळपणाने उत्तर दिलं. व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, त्या गोष्टी, ज्या तुम्ही रोज नाही पाहात. (Things you don't see everyday)

कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं आहे की, प्रामाणिकपणे केलेला, सूचना देणारा आणि चौकट तोडणारा संवाद. आम्ही हे केलंय तुम्हीही करू शकता..चला पीरियड्सवर बोलूया!

ही व्हिडीओ क्लिप जेव्हा ऑनलाइन शेअर करण्यात आली तेव्हा सोशल मीडियावरुन सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आणि या खेळाडूचंही कौतुक केलं जात आहे.

First published:

Tags: IPL 2020, Rajasthan