सानिया मिर्झानं हसन आणि सामियाला दिली अशी ट्रीट, पाहा PHOTO

सानिया मिर्झानं हसन आणि सामियाला दिली अशी ट्रीट, पाहा  PHOTO

शोएब मलिकनंतर पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीने भारतीय मुलीशी लग्न केलं. त्यानंतर सानिया मिर्झासह शोएबने हसन अली आणि सामियाला पार्टी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीनं नुकतंच 20 ऑगस्टला भारताच्या सामिया आरजू हिच्याशी लग्न केलं. दुबईतील एका हॉटेलमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी नवपरिणित जोडप्याला पार्टी दिली आहे. याचा फोटो हसन अलीनं शेअर केला आहे.

हसन अली आणि शोएब मलिक यांच्यात एक चांगलं नातं आहे. लग्नाआधी सानियानं दोघांना शुभेच्छा देताना खोचक ट्विट केलं होतं. आता हसनने सानिया आणि शोएब मलिक यांनी दिलेल्या पार्टीनंतर त्यांचे आभार मानले आहेत.

भारतातील हरियाणात राहणाऱ्या सामिया आरजू आणि पाकिस्तानी गोलंदाज हसन अली यांनी आठवड्याभरापूर्वी लग्न केलं होतं. सामिया दुबईतील एअर अमिरातीत फ्लाइट इंजिनिअर आहे. वर्षभरापूर्वी त्यांची मैत्री झाली होती.

लग्नात सामिया भारतीय पोषाखात दिसली होती तर हसन अलीनं पाकिस्तानची पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. शामिया आणि हसन अली यांच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र शामियाच्या वडीलांनी, "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले", असे सांगितले होते.

नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 25, 2019, 2:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading