विश्वचषकाआधी 'या' खेळाडूनं घेतला मोठा निर्णय, खेळणार नाही एकही टी-20 सामना

या फलंदाजानं विश्वचषकाआधी कोणताही टी-20 सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

क्रिकेटच्या विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. आयसीसी विश्वचषकासाठी सर्व संघानी आपल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. दरम्यान एकीकडं भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असताना, एका खेळाडूनं टी-20 सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या तुफानी फलंदाजीमुळं आणि संयमी खेळीमुळं नेहमीच चर्चेत असणारा साऊथ आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलासध्या एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. आफ्रिकेचा या दिग्गज खेळाडूनं विश्वचषकाधी एकही टी-20 सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

टी-20 सामन्यात होणाऱ्या दुखापतींपासून स्वत:ला वाचवण्यासाठी आमलानं हा निर्णय घेतला आहे. त्याकरिता त्यानं CSA टी-20 सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

आमलासाठी या वर्षाची सुरुवात विशेष चांगली राहिली नाही. आतापर्यंत सात सामन्यात त्यानं केवळ 10.14च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, दोन सामन्यात तो शुन्यावर बाद झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या