रावळपिंडी, 07 फेब्रुवारी: सध्या दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून रावळपिंडी येथे दक्षिण अफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तान (Pakistan) दरम्यान दुसरा कसोटी सामना (2nd Test match) खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ वरचढ ठरताना दिसत आहे. पाकिस्ताने पहिल्या डावात 272 धावा केल्या होत्या. तर पहिल्या डावात दक्षिण अफ्रिका संघ अवघ्या 201 धावांत गारद झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला 71 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही पाकिस्तान चांगल्या स्थितीत असून 8 विकेट्सच्या मोबदल्यात 321 धावांची लीड मिळवली आहे. या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे.
या सामन्यांत पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत पाच विकेट्स पटकावल्या आहेत. हसन अलीने 15.4 ओव्हरच्या बदल्यात 54 धावा देत 5 गडी बाद केले आहेत. त्याने सुरुवातीपासूनच दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या माऱ्याने सळो की पळो करुन सोडलं आहे. त्याने दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज लॉर्ड लिंडेला ज्या पद्धतीने माघारी धाडलं आहे, त्यामुळे हसन अलीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं जात आहे.
Hasan Ali's off-cutter is a thing of beauty.#PAKvSApic.twitter.com/WlFKINmDzg
— Wisden (@WisdenCricket) February 6, 2021
लॉर्ड लिंडेला आऊट केल्याचा हा व्हिडीओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी हसन अलीने आपल्या गोलंदाजीत विविधता दाखवत दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना चक्रावून सोडलं आहे. यावेळी त्याने लॉर्ड लिंडेला टाकलेला बॉल अप्रतिम होता, या बॉलवर बोल्ड झाल्यानंतरही लॉर्ड लिंडे पाहतच राहिला आहे. दक्षिण अफ्रिकेचा फलंदाजही त्याचं कौशल्य पाहून नतमस्तक झाला आहे.
Five-wicket haul for @RealHa55an! 👏👏👏👏👏
Watch #PAKvSA Live: https://t.co/JDojbzmfIr#HarHaalMainCricket #BackTheBoysInGreen pic.twitter.com/k8OIm6qSYn — Pakistan Cricket (@TheRealPCB) February 6, 2021
2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने दमदार कामगिरी करत पहिला सामना आपल्या खिशात घातला आहे. त्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकणं दक्षिण अफ्रिकेसाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे. हसन अलीने यापूर्वी आपल्या गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने यापूर्वी न्यूझीलंड विरोधातही एका डावात 5 गडी बाद केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news