मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Cricket: 'त्या' रन आऊटवरुन हर्षा भोगले-बेन स्टोक्समध्ये रंगलं 'ट्विटरवॉर', पाहा कुणी केला कुणावर वार?

Cricket: 'त्या' रन आऊटवरुन हर्षा भोगले-बेन स्टोक्समध्ये रंगलं 'ट्विटरवॉर', पाहा कुणी केला कुणावर वार?

हर्षा भोगले - स्टोक्समध्ये ट्विटरवॉर

हर्षा भोगले - स्टोक्समध्ये ट्विटरवॉर

Cricket: दिप्ती शर्मानं केलेल्य त्या रन आऊटनंतर बोलणाऱ्यांविरोधात हर्षा भोगलेंनी ट्विटची मालिका सुरु केली आणि त्यांना ट्विटमधून उत्तर दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 01 ऑक्टोबर: भारतीय महिला संघानं गेल्या आठवड्यात इंग्लंडला त्यांच्याच देशात वन डे मालिकेत व्हाईटवॉश दिला. भारतीय महिलांनी इंग्लिश भूमीत पहिल्यांदाच असा पराक्रम गाजवला. लॉर्ड्सच्या त्या अखेरच्या वन डेत भारतीय संघ 16 धावांनी विजयी झाला. पण एका विकेटमुळे आजही त्या सामन्याची आणि त्या विकेटची चर्चा सोशल मीडियात रंगताना दिसतेय. त्यात आता कॉमेंटेटर हर्षा भोगले आणि बेन स्टोक्स यांचीही भर पडली आहे.

नेमकं काय घडलं?

इंग्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज असताना भारताची बॉलर दिप्ती शर्मानं इंग्लंडच्या डीनला नॉन स्ट्रायकर एन्डला रन आऊट केलं. हा निर्णय थर्ड अम्पायरकडे गेला. अम्पायरनं बॅट्समनला आऊट दिलं. ही इंग्लंडची शेवटची विकेट होती त्यामुळे भारतीय टीम 16 धावांनी विजयी ठरली. पण दिप्ती शर्माच्या त्या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यात इंग्लिश खेळाडू आघाडीवर होते. गेले काही दिवस सोशल मीडियात सुरु असलेल्या या चर्चांमुळे काल हर्षा भोगले यांनी तो निर्णय बरोबर असल्याचं समर्थन करत काही ट्विट्स केले. त्यावर आज बेन स्टोक्सनं टिप्पणी केली. पण त्यालाही हर्षा भोगलेनी जोरदार उत्तर दिलं आहे.

हर्षा - स्टोक्स ट्विटरवॉर

दिप्ती शर्माच्या त्या कृतीवर बोलणाऱ्यांविरोधात हर्षा भोगलेंनी ही ट्विटची मालिका सुरु केली आणि त्यांना ट्विटमधून उत्तर दिलं. हर्षा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की...  'इंग्लंडनं जगाच्या मोठ्या भागावर दीर्घकाळ राज्य केलं आहे. त्यावेळी काही प्रश्न निर्माण झाले. त्याचा परिणाम असा झाला की आज इंग्लंडला जे चुकीचं वाटत आहे ते बाकीच्या संघांनीही त्याच पद्धतीने स्वीकारावं आणि समजून घ्यावं अशी मानसिकता तयार झाली आहे. हे तसंच आहे जसं की ऑस्ट्रेलियन लोक त्यांच्या सीमा ओलांडू नका असा उपदेश करतात. त्यांनी स्वत: त्यांच्या संस्कृतीनुसार हा नियम केला आहे. पण तो इतरांसाठीही चांगला असेलच असं नाही. संपूर्ण जग इंग्लंडच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही. समाजात कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे क्रिकेटमध्येही ते लागू होतात. मी या कारणामुळे हैराण आहे की दिप्तीला अनेकजण विनाकारण दोषी ठरवत आहेत. तिनं जे केलं ते क्रिकेटच्या नियमानुसार केलं. त्यामुळे तिच्यावरुन होणारी ही चर्चा आता बंद व्हायला हवी.'

हेही वाचा - Womens Asia Cup: आऊट की नॉट आऊट? थर्ड अम्पायरच्या निर्णयानं युवराज सिंगही हैराण

हर्षाच्या ट्विटवर स्टोक्सचं उत्तर

हर्षा भोगलेंचं हे ट्विट स्टोक्सला रुचलं नाही. त्यानं त्यावर रिप्लाय दिला... 'हर्षा मला हे सांगायचंय की 2019 च्या वर्ल्ड कपला आता 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय. पण आजही भारतीय फॅन्स मला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवतात. तर याचा तुम्हाला त्रास होतो का?'

हर्षा भोगलेंनी आपल्या ट्विटमध्ये इंग्लंडच्या संस्कृतीवरच बोट ठेवलं. दिप्तीच्या समर्थनात हर्षानं ट्विट करताना म्हटलं होतं की 'मुद्दा संस्कृतीचा आहे, ते अशा विचारसरणीत वाढलेले आहेत की त्यांना समजत नाही काय चूक आहे? ते जे चुकीचे मानतात, तेच इतरांनीही समजावे असे त्यांना वाटते. इथूनच त्रास सुरू होतो.'

स्टोक्सची ट्विटची मालिका सुरुच

त्यानंतरही स्टोक्सनं भोगलेंना त्यांच्या संस्कृतीच्या मुद्द्यावरुन टार्गेट केलं. स्टोक्सनं म्हटलंय की, 'तुम्हाला हा संस्कृतीचा विषय आहे असं वाटतं का? अजिबात नाही… मला 2019 च्या वर्ल्ड कपनंतर जगभरातील लोकांकडून निरनिराळ्या प्रकारचे मेसेज येणं सुरु आहे. त्याचप्रमाणे लोक दीप्ती शर्माच्या मंकडच्या विरोधात ट्विट करत आहेत. यामध्ये इंग्लंड हा एकमेव क्रिकेट खेळणारा देश नाही. बाकीचे देशही या नियमाबाबत आपले मत मांडत आहेत.'

MCC चं स्पष्टीकरण

क्रिकेट नियम बनवणारी आणि त्या नियमांचं संरक्षण करणरी संस्था म्हणजे मेरिलिबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसी. एमसीसीनं नुकतंच क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यात नॉन स्ट्राईक एन्डवरील रन आऊटबाबतच्या नियमाचाही समावेश आहे. लॉर्ड्सवरच्या त्या घटनेनंतर एमसीसीनं एक अधिकृत माहिती जारी केली. त्यात बॅट्समनन्सना थेट इशाराच देण्यात आला.

एमसीसीनं आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय... 'बॉलरच्या हातून बॉल सुटेपर्यंत नॉन स्ट्राईकर एन्डच्या बॅट्समननं क्रीझच्या आत असावं. तेव्हाच लॉर्ड्सवर जे घडलं ते होणार नाही. तो निर्णय नियमाला धरुन होता.'

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports