मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IndW vs EngW: लॉर्ड्स वन डेआधी हरमनप्रीत कौर का रडली? पाहा मैदानात नेमकं काय घडलं?

IndW vs EngW: लॉर्ड्स वन डेआधी हरमनप्रीत कौर का रडली? पाहा मैदानात नेमकं काय घडलं?

लॉर्ड्स वन डेआधी हरमनच्या डोळ्यात अश्रू

लॉर्ड्स वन डेआधी हरमनच्या डोळ्यात अश्रू

IndW vs EngW: भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आपल्या कारकीर्दीतला अखेरचा सामना खेळत आहे. पण या सामन्याआधी संघातल्या खेळाडूंशी बातचीत करताना आज भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अश्रूंचा बांध मात्र फुटला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

लंडन, 24 सप्टेंबर: भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं तर दुसरा सामना हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं आपल्या नावावर केला. त्यामुळे मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे आज लॉर्ड्सवर सुरु असलेला तिसरा वन डे सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. पण या सामन्याआधी संघातल्या खेळाडूंशी बातचीत करताना आज भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अश्रूंचा बांध मात्र फुटला.

झुलनचा अखेरचा सामना

लॉर्ड्सवरच्या या सामन्यात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आपल्या कारकीर्दीतला अखेरचा सामना खेळत आहे. 39 वर्षांची झुलन या सामन्यानंतर आपल्या दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला विराम देईल. झुलननं या मालिकेआधीच निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आपल्यासोबत ती अखेरचा सामना खेळत असल्यानं हरमनप्रीत कौर भावूक झाली होती.

हेही वाचा - Jhulan Goswami: ‘दोन वेळा वर्ल्ड कप फायनल खेळले पण...’ निरोपाच्या वन डे आधी झुलननं व्यक्त केली खंत

हरमननं झुलनला दिला अनोखा सन्मान

त्यानंतर टॉसवेळी हरमनप्रीत मैदानात उतरली तेव्हा तिनं झुलनला तिच्या अखेरच्या सामन्यात एक वेगळाच सन्मान दिला.

टॉसवेळी हरमनसोबत झुलनही मैदानात उपस्थित होती. इंग्लंडची कॅप्टन एमी जोन्सनं जेव्हा कॉईन उडवला त्यावेळी हरमननं झुलनला कॉल करण्याचा मान दिला. पण नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला. मात्र हरमनच्या या कृतीचं अनेकांनी कौतुक केलं.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports