नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : भारतीय महिला टी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने अनोखं 'शतक' केलं आहे. झटपट क्रिकेटच्या या प्रकारात हरमनप्रीतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात मैदानावर पाऊल टाकताच एक विक्रम नावावर नोंदवला. भारताकडून टी20 मध्ये सर्वात आधी 100 सामने खेळण्याचा विक्रम तिने केला.
भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत हरमनप्रीतनंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी 98 सामने खेळले आहेत. तर हरमनप्रीत कौरने या दोघांच्या आधी शतक गाठलं आहे. शंभराव्या सामन्यापूर्वी हरमनप्रीतला 100 नंबरची खास कॅप देण्यात आली. बीसीसीआयने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
A special cap for captain @ImHarmanpreet to mark her 100th T20I for #TeamIndia #INDvSA 🇮🇳🇮🇳👏🇮🇳 pic.twitter.com/Sp6KFUca9o
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2019
2009 मध्ये पहिला टी20 सामना खेळणाऱ्या हरमनप्रीतने या प्रकारात एक शतकही केलं आहे. तिने 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावांची खेळी केली होती. याशिवाय तिच्या नावावर सहा अर्धशतकांचा समावेश आहे. शतकी सामन्यात मात्र तिला फक्त 8 धावाच करता आल्या. आतापर्यंत 100 सामन्यात 28.22 च्या सरासरीने हरमनप्रीतने 2004 धावा केल्या आहेत.
VIDEO : तावडेंना आता कळलं असेल, यादीत नाव नसलं की कसं वाटतं? एकच सोशलकल्लोळ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा