VIDEO : ‘माझ्या बहिणीसोबत झोपला खेळाडू’, कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

VIDEO : ‘माझ्या बहिणीसोबत झोपला खेळाडू’, कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

सामन्याआधीच कर्णधाराच्या बहिणीसोबत झोपला खेळाडू, वाचा काय आहे प्रकरण.

  • Share this:

पार्ल, 08 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या मझांसी सुपर लीग 2019मध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील विविध घटनांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच चायनामॅन गोलंदाज तबरेज शम्सीने भरमैदानात जादूगारी दाखवण्यास सुरुवात केली. शम्सीच्या जादूगारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता कर्णधार फाफ ड्युप्लेसिसनं एक धक्कादायक खुलासा केला.

पार्ल रॉक्सचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी नेल्सन मंडेला बे जायंट्सविरूद्ध खेळत असताना टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर त्यानं एक अत्यंत वादग्रस्त विधान केले. टॉस जिंकल्यानंतर संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळाली आहे असे विचारले असते, “संघात बदल आहे. हार्डस विल्जॉईन आज खेळत नाही कारण तो माझ्या बहिणीबरोबर झोपला आहे. शनिवारी या दोघांचे लग्न झाले”, असे सांगितले. फाफ डु प्लेसिसचे विधान ऐकून सर्वांनाच धक्का बसला आणि प्रश्न विचारणाराही हसू लागला. डुप्लेकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा-लग्नानंतर पत्नीच्या स्कुटीवरून भारतीय क्रिकेटपटूची 'विदाई', PHOTO VIRAL

हार्डस विल्जॉईन हा डू प्लेसिसच्या रेमी रेहिनर्स हिला डेट करीत होता. दरम्यान सामन्याच्या एक दिवसआधी या दोघांनी विवाह केला. हार्डस विल्जॉईन आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत होता. हार्डस विल्जॉईन यानं गोलंदाज म्हणून 2016मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले.

वाचा-दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया करणार रेकॉर्डब्रेक कामगिरी! रचले जाणार 6 विक्रम

वाचा-‘मैदानात धोनी...धोनी ओरडू नका’, या कारणामुळे कोहलीनं दर्शकांना केली विनंती

पार्ल रॉक्स संघाचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसला या स्पर्धेत चांगली फलंदाजी करता आली नाही. पार्ल रॉक्स विरुद्ध नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात फाफनं केवळ 22 धावांची खेळी केली. मात्र, फाफच्या संघाने 168 धावांची चांगली धावसंख्या रचली. या सामन्यात कॅमेरून डेलपोर्टने 39 आणि हेनरी डेव्हिड्सने 31 धावा केल्या. व्हेरिनेनीने नाबाद 36 धावा केल्या तर, इसरू उदानानेही 27 धावांची खेळी केली.

Published by: Priyanka Gawde
First published: December 8, 2019, 5:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading