टीम इंडियासाठी गुड न्यूज! स्टार खेळाडू IPL 2020आधी करणार कमबॅक

भारताचा हा स्टार खेळाडू झाला फिट, आयपीएलआधी कमबॅक करण्याची शक्यता.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 01:53 PM IST

टीम इंडियासाठी गुड न्यूज! स्टार खेळाडू IPL 2020आधी करणार कमबॅक

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : भारतानं वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिक आणि वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी केली आहे. मात्र भारताचे लक्ष्य पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीप असणार आहे. मात्र या सगळ्यात भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळं क्रिकेट खेळू शकत नाही आहेत. याआधी जसप्रीत बुमराहच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळं त्यानं क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. दरम्यान आता आणखी एक गोलंदाज दुखापतीमुळं क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. हा स्टार खेळाडू आहे, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या.

पाठीच्य दुखापतीमुळं पांड्याला पाच ते सहा महिने क्रिकेटपासून लांब रहावे लागणर आहे. दरम्यान, उपचारासाठी हार्दिक इंग्लंडला रवाना झाला होता. यात त्याची सर्जरी यशस्वी झाली आहे. पांड्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत सर्जरी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली. आपला हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत, “सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार. मी लवकरच कमबॅक करेन”, असे लिहिले आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई कप दरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही पांड्यानं आयपीएल, वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिका दौरा खेळला होता. मात्र कसोटी संघात त्याला सामिल करण्यात आले नाही.

वाचा-सोशल मीडियावर क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकनं मृत्यू, ट्विटरवर झाला खुलासा

 

Loading...

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

Surgery done successfully Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

वाचा-क्रिकेट पाहणंही सोडलेल्या खेळाडूची कमाल, दिग्गजांनाही टाकलं मागे

सर्जरीनंतर पांड्या काही काळ मैदानापासून लांब राहणार आहे. बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पांड्या मैदानात उतरणार नाही. बांगलादेश विरोधात 3 नोव्हेंबरपासून मालिका सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर पांड्याला विश्रांती दिली होती. त्यामुळं आयपीएल 2020आधी पांड्या मैदानावर दिसू शकतो.

25 वर्षांच्या पांड्यानं 11 कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. यात 532 धावा केल्या आहेत. तर 54 एकदिवसीय सामन्यात 937 धावा केल्या आहेत तर 54 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 सामन्यात 310 धावा आणि 38 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-अजिंक्य रहाणे झाला बापमाणूस, हरभजनने केलं अभिनंदन

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...