मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हार्दिक पांड्या चाहत्यासोबतच्या वर्तनामुळे ट्रोल, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

हार्दिक पांड्या चाहत्यासोबतच्या वर्तनामुळे ट्रोल, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खराब फिटनेसमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही (India vs South Africa) त्याची निवड झालेली नाही.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 26 डिसेंबर : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या खराब फिटनेसमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही (India vs South Africa) त्याची निवड झालेली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली, यानंतर हार्दिक पांड्यावर जोरदार टीका झाली. आयपीएल 2022 साठी मुंबई इंडियन्सनी हार्दिकला रिटेन केलं नाही, त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या मोसमात हार्दिक दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसू शकतो. हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर चाहते हार्दिकसोबत फोटो काढण्यासाठी आले. यातल्या एकाने हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण पांड्याला ही गोष्ट आवडली नाही आणि त्याने चाहत्याने खांद्यावर ठेवलेला हात काढला. हार्दिकच्या या वर्तनामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. एका चाहत्याने तर हार्दिक एटीट्यूड दाखवत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने तुझे वाईट दिवस विसरलास का? असा प्रश्न विचारला.
हार्दिक पांड्याने आयपीएल 2021 मध्ये बॉलिंग केली नाही, तेव्हादेखील त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. तरीही त्याची भारताच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये निवड करण्यात आली. यानंतर आता हार्दिक दुखापतीवर उपचार घेत आहे, त्यामुळे तो सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला नाही. भारतीय निवड समिती आता हार्दिक पांड्याचा पर्याय शोधत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) संधी देण्यात आली होती. अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये बॅट आणि बॉलनेही उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे सीरिजसाठी त्याची निवड होऊ शकते.
First published:

Tags: Hardik pandya

पुढील बातम्या