जहीरला शुभेच्छा देतानाची फिरकी पांड्याला महागात, चाहत्यांनी घेतलं फैलावर

जहीरला शुभेच्छा देतानाची फिरकी पांड्याला महागात, चाहत्यांनी घेतलं फैलावर

जहीर खानला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छानंतर चाहत्यांनी हार्दीक पांड्याला केएल राहुलच्या रिप्लायची आठवण करून दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत व्यग्र आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. संघातील दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा समावेश आहे. पांड्या पाठदुखीने त्रस्त असून त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. सर्जरी यशस्वी झाल्याचंही त्याने फोटो शेअर करत सांगितलं होतं.

दरम्यान, आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छामुळे हार्दीक पांड्यावर टीका केली जात आहे. जहीर खानला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दीक पांड्याने फिरकी घेण्याच्या अंदाजात शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार पांड्याच्या अंगलट आला असून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

पांड्याने जहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जहीरच्या गोलंदाजीवर तो षटकार मारत आहे. पांड्याने म्हटलं की, वाढदिवसाच्या शुभेच्छा जहीर, आशा आहे की तुसुद्धा असंच करशील जे मी व्हिडिओत केलं आहे.

वाढदिवसाला अशा प्रकारे शुभेच्छा दिल्यानंतर चाहत्यांनी पांड्याला फैलावर घेतलं. एकाने पांड्याला थोडं नम्रतेनं वाग असाही सल्ला दिला आहे. तसेच दुसऱ्या एका चाहत्यानं म्हटलं की, गोलंदाज असूनही जहीर खानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 53 षटकार मारले आहेत. जर तु त्याच्या जागी खेळत असतास तर तुझ्या पायाचा अंगठा तुटला असता.

चाहत्यांनी पांड्याला जहीर खानने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये जहीर खानने 21 गडी बाद करून मोठी भूमिका बजावली होती. तसेच जहीरने त्याच्या कारकिर्दीत 92 कसोटीमध्ये 311 बळी घेतले असून 200 एकदिवसीय सामन्यात 282 बळी घेतल्याचंही पांड्याला सांगितलं.

सर्जरीनंतर पांड्याने फोटो शेअर केला होता. त्यावर कमेंट करताना केएल राहुलने म्हटलं होतं की, डॉक्टरांनी तुझा मेंदूही ठीक केला असेल.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 02:45 PM IST

ताज्या बातम्या