IND vs WI : वेस्ट इंडिज दौरा नाही सोपा, भारताचा 'हा' अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर

IND vs WI : वेस्ट इंडिज दौरा नाही सोपा, भारताचा 'हा' अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर

3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरलेला भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे अद्याप निवड झालेली नाही. निवड समिती सध्या विराट कोहलीचे कर्णधारपद, धोनीची निवृत्ती, रवी शास्त्री यांचे प्रशिक्षकपद या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत आहे. आज भारतीय संघ जाहीर करण्यात येणार होता, मात्र निवड समितीनं ही तारिख पुढे ढकलली. आता रविवारी निवड समितीच्या बैठकीनंतर कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार ते कळणार आहे.

दरम्यान, यामुळं टी-20साठी वेस्ट इंडिजला रवाना होणाऱ्या संघात बदल होऊ शकतात. दरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान सलामीचा फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळं वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याचे आणि विजय शंकरचे भवितव्य निवड समिती ठरवणार आहे. यातच आता भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही या दौऱ्याला मुकणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार निवड समिती खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टची वाट पाहत आहे. त्यामुळं वर्षभर क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंना बीसीसीआय या दौऱ्यात विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संघात स्थान देऊ शकते.

वाचा- ICCने सचिनला Hall Of Fameमध्ये स्थान देण्यास केला उशीर? 'हे' आहे कारण

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

सैनी-अहमद यांना मिळू शकते संधी

जर निवड समितीनं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती दिल्यास नवदीप सैनी आणि खलील अहमद यांना संघात जागा मिळू शकते. तर, विकेटकिपिंगसाठी धोनीच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते.

वाचा- इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्याचा न्यूझीलंड करणार सन्मान! 

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.

वाचा- ICC च्या एका निर्णयानं 30 खेळाडूंचं करिअर उद्ध्वस्त!

खोटी घरभाडे पावती दाखवाल तर होणार ही कारवाई; इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 02:43 PM IST

ताज्या बातम्या