मोहाली, 20 सप्टेंबर: मोहालीच्या मैदानात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 6 बाद 208 धावांचा डोंगर उभारला. पण भारतीय डावाच्या उत्तररार्धात मैदानात जणू वादळच घोंगावत होतं. हार्दिक पंड्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढताना चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या फलंदाजीसमोर कांगारुंच्या बॉलर्सनी अक्षरश: लोटांगण घातलं. हार्दिकनं आपल्या नाबाद 71 धावांच्या खेळीत तब्बल 7 फोर आणि पाच षटकार ठोकले.
पंड्याचा स्ट्राईक रेट दोनशेपार
मोहालीत हार्दिकनं बॉलर्सची जराही गय केली नाही. त्यानं आपली नाबाद 71 धावांची खेळी अवघ्या 30 बॉलमध्ये साकारली. त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट 200 च्या पार पोहोचला होता. त्यानं कॅमेरुन ग्रीनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तीन बॉलवर सलग तीन सिक्स ठोकून भारताला 200 चा टप्पा पार करुन दिला. हार्दिक पंड्याचं आंतरराष्ट्रीय टी20तलं हे आजवरचं दुसरंच अर्धशतक ठरलं. तर त्यानं केलेली नाबाद 71 धावांची खेळी त्याच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम टी20 खेळी ठरली.
Hardik Pandya is bloody good. pic.twitter.com/TPQCwkH27T
— Johns. (@CricCrazyJohns) September 20, 2022
राहुलचं अर्धशतक, सूर्यकुमारची फटकेबाजी
टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलनं आशिया कपमधला आपला फॉर्म कायम राखला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20त राहुलनं खणखणीत अर्धशतक ठोकलं. मोहालीतल्या या सामन्यात राहुल ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर अक्षरश: तुटून पडला. राहुलनं आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 62 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून मोठी खेळी आली. त्यानंत 35 बॉलमध्ये 55 धावा फटकावल्या. त्यात 4 फोर आणि 3 सिक्सर्सचा समावेश होता. राहुलचं आंतरराष्ट्रीय टी20तलं हे आजवरचं 18वं अर्धशतक ठरलं.
Surya lighting up the night SKY here in Mohali 👌👌
Follow the match 👉 https://t.co/ZYG17eC71l #TeamIndia | @surya_14kumar Don’t miss the LIVE coverage of the #INDvAUS match on @StarSportsIndia pic.twitter.com/vg8nyKfASS — BCCI (@BCCI) September 20, 2022
सूर्यकुमारनंही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेताना 25 बॉलमध्ये 46 धावा फटकावल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Hardik pandya, Sports, T20 cricket