संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या भावुक, 3 वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या भावुक, 3 वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या दोघांनाही पाठदुखीमुळं क्रिकेटपासून दूर रहावं लागत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : भारतीय संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या सध्या फिट नसल्यामुळं संघाबाहेर आहे. हार्दिकनं नुकतीच लंडनमध्ये एक सर्जरी केली, त्यामुळं मैदानात परतण्यासाठी तो आता प्रयत्न करत आहेत. दरम्यान याआधी हार्दिकनं ट्विटरवर तीन वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हार्दिक पांड्यानं आजच्याच दिवशी 2016मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तीन वर्षांपूर्वी याच दिवशी हार्दिकला दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्याच हातून डेब्यु कॅप मिळाली होती. हार्दिकनं कपिल यांच्यात हातातून कॅप घेतानाच फोटो ट्वीट केला आहे. यासोबत भावुक असा मेसेजही हार्दिकनं लिहिला आहे.

पांड्यानं आपल्या पदार्पणाच्या आठवणींत, “आजच्या दिवशी तीन वर्षांपूर्वी मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टीम इंडियाकडून खेळताना आजपर्यंतचा प्रवास हा अविस्मरणीय राहिला आहे. जेव्हा जेव्हा मैदानावर पाऊल ठेवले आहे तेव्हा तेव्हा एका लहान मुलानं उराशी बाळगलेल्या स्वप्नाची आठवण होते. माझ्यासाठी यापेक्षा जास्त सन्मानाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही”, असे ट्वीट केले आहे.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी होणार भारत-पाक सामना, असा आहे ICCचा प्लॅन

सर्जरीनंतर पांड्या काही काळ मैदानापासून लांब राहणार आहे. बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी पांड्या मैदानात उतरणार नाही. बांगलादेश विरोधात 3 नोव्हेंबरपासून मालिका सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर पांड्याला विश्रांती दिली होती. त्यामुळं आयपीएल 2020आधी पांड्या मैदानावर दिसू शकतो.

वाचा-क्रिकेटमधली ऐतिहासिक घटना, 17 वर्षांच्या भारतीय फलंदाजानं केले विक्रमी द्विशतक!

दरम्यान, पांड्यानं 2016मध्ये न्यूझीलंड विरोधात धर्मशाला येथून आजच्या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पांड्यानं आतापर्यंत 54 एकदिवसीय सामन्यात 957 धावा केल्या आहेत. यात 54 विकेटचाही समावेश आहे. त्यामुळं हार्दिक पांड्या टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर, हार्दिकनं कसोटी क्रिकेटमध्ये 1 शतकासह 532 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 310 धावा केल्या आहेत. तर, कसोटीमध्ये 17 आणि टी-20मध्ये 38 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-पुन्हा एकदा दिसणार ‘सचिन पर्व’, दिग्गजांविरुद्ध उतरणार टी-20च्या मैदानात

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 16, 2019, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading